मुंबई

आजपासून सुरु झालेल्या स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक खास तुमच्यासाठी..

सकाळवृत्तसेवा

मुंबई- देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या नागरिकांना आपआपल्या घरी पाठवण्यासाठी भारतीय रेल्वेनं स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत 12 मेपासून म्हणजेच आजपासून बंद झालेली रेल्वेची प्रवासी वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. नवी दिल्लीतून वेगवेगळ्या राज्यात 15 स्पेशल एसी गाड्या चालवण्यात येताहेत. 

रेल्वेने नवी दिल्लीतून देशभरातील विविध ठिकाणी जाणाऱ्या आणि येणाऱ्या एकूण 30 फेऱ्या चालवण्यासाठी रविवारी मंजुरी दिली. 15 मोठ्या शहरांमधून या रेल्वेगाड्या धावतील.

पहिली स्पेशल ट्रेन नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल

नवी दिल्लीहून पहिली ट्रेन (गाडी क्रमांक 02952) संध्याकाळी 4.55 वाजता सुटून मुंबई सेन्ट्रलला दुसऱ्या दिवशी सकाळी 8.45 वाजता पोहोचेल. ही गाडी सुरत, वडोदरा, रतलाम आणि कोटा येथे थांबेल. तर मुंबईतून पहिली गाडी आज संध्याकाळी 5.30 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 02951 मुंबई सेन्ट्रल येथून संध्याकाळी 5.30 वाजता सुटेल आणि नवी दिल्ली येथे बुधवारी सकाळी 9.05 वाजता पोहोचेल. या गाड्या दररोज धावणार आहेत. याशिवाय नवी दिल्लीहून मडगावसाठीही रेल्वे गाडी 15 मेपासून धावणार असून रत्नागिरी, पनवेल अन्य तीन स्थानकात तिला थांबा देण्यात आला आहे. 

तिकिट बुकींगची प्रक्रिया जाणून घ्या 

भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट www.irctc.co.in वर लॉग इन करा. 

वेबसाईटवर तुम्हाला LOGIN चा पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर त्यात यूझर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा भरा. एखाद्याच IRCTC वर लॉगइन आयडी नसेल तर REGISTER ऑप्शनवर क्लिक करा. रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक, नाव ईमेल आयडी आणि पत्ता टाकावा लागेल. 

ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही Book Your Ticket लिहिलेल्या बॉक्सवर क्लिक करा. त्यात आवश्यक अशी माहिती तुम्हाला टाकावी लागेल. तुम्हाला कोणत्या ठिकाणी प्रवास करायचा आहे त्याची माहिती भरा. From च्या पर्यायावर तुम्ही जेथून प्रवास करणार ते ठिकाण आणि To च्या पर्यायावर ज्या ठिकाणी जायचे आहे ते ठिकाण भरा. यानंतर तारीख सिलेक्ट करून Find Trains वर क्लिक करा.

तुम्ही भरलेल्या दोन्ही स्थानकांदरम्यान असलेल्या सर्व स्पेशल ट्रेनची यादी तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर Check Availability & Fare चा पर्याय दिसेल. तिथेच तुम्हाला स्लिपर क्लास, एसी 3 टायर, एसी 2 टायर, एसी फर्स्ट क्लास, एसी चेअर कार आणि एग्जिक्युटिव्ह चेअर असे पर्याय दिसतील. Check Availability & Fare वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला कोणत्या ट्रेनचे तिकिट उपलब्ध आहे ते दिसेल. 

ज्या ट्रेनचे तिकिट तुम्हाला बुक करायचे आहे, त्यावर सिलेक्ट करा आणि Book Now वर क्लिक करा. 

बुक नाऊवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं नाव, वय, लिंग, मोबाइल नंबरसह इतर माहिती त्यात भरा आणि Continue Booking वर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर पेमेंटचा पर्याय असलेली विंडो ओपन होईल. यात रेल्वेनं तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग किंवा मोबाइल वॉलेटच्या मदतीनं पेमेंट करण्याचा पर्याय दिला आहे. तुमच्या सोयीनुसार ते पेमेंट तुम्ही करु शकता. 

पेमेंट झाल्यानंतर तुमचे तिकिट बुक होईल. तिकिट बुक झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईल क्रमांकावर येईल. तिकिट बुक झाल्यानंतर प्रिंटचा पर्यायही येतो.

असं असेल ट्रेनचं भाडं

या गाड्यांचे भाडे सुपर फास्ट ट्रेनसारखेच असणार आहे. या गाड्यांच्या डब्यांच्या सर्व 72 जागांवर बुकिंग करण्यात येणार असून त्यांच्या भाड्यात कोणतीही सूट मिळणार नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. तसेच, प्रवाशांना आरोग्यसेतू अ‍ॅप अनिवार्य असेल. प्रवासा दरम्यान सर्व प्रवाशांना नाकातोंडावर मास्क परिधान करणे बंधनकारक असेल. तसेच, प्रवाशांना आरोग्यसेतू अ‍ॅप अनिवार्य असेल.

know full time table of special trains run by government of india

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT