mumbai high court esakal
मुंबई

कुप्रथा बंद करा, कृष्णावेणी यात्रेवरून हायकोर्टाने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले

सकाळ डिजिटल टीम

एखाद्याच्या शेतात असलेलं पीक असं उद्ध्वस्त करून जत्रा भरवणे हे दुर्दैवी असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी शेतात उभा असलेल्या पीकावर जेसीबी चालवल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाने फटकारलं आहे. कृष्णा पंचगंगा संगमावर कृष्णावेणी जत्रा साजरा करण्यासाठी याचिकाकर्त्याची जमीन वापरता येणार नाही असंही सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप राज्यात काही निर्बंध लागू आहेत. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेला परवानगी कशी दिली असा प्रश्नही खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. एखाद्याच्या शेतात असलेलं पीक असं उद्ध्वस्त करून जत्रा भरवणे हे दुर्दैवी असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

कोल्हापूरच्या शशिकला आंबडे यांनी आपल्या जमिनीचा सरकार वापर करत असल्याबाबत याचिका दाखल केली होती. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित उत्सवासाठी प्रशासनाने उभ्या पीकावर जेसीबी चालवला होता. यावर सुनावणी करताना न्यायालयाने पिकांचं नुकसान करत जत्रा भरवण्याची कुप्रथा बंद करा असे म्हटले आहे. या सुनावणीला कोल्हापूर जिल्हाधिकारी कोर्टसमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर झाले.

न्यायालयाने सुनावणी करताना म्हटलं की, उत्सव केवळ सार्वजनिक रस्त्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात यावेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे यंदा कृष्णावेणी यात्रेच्या आयोजनावर मर्यादा आल्या आहेत. आता या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि नगरपरिषद मुख्याधिकारी यांना 10 मार्चला उत्तर देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

कोल्हापुरात कुरुंदवाडमध्ये कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर दरवर्षी महाशिवरात्रीला कृष्णावेणी यात्रा भरते. खासगी जमीनी घेऊन त्याठिकाणी यात्रा भरवण्यात येते. यावेळी शेती प्रदर्शन आणि जनावरांचेही प्रदर्शन असते. याच यात्रेसाठी नगर परिषदेने शशिकला सुरेंद्र आंबडे यांच्या शेतातलं पीक जेसेबीने उद्ध्वस्त केलं. याविरोधात आंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सोमवारी सायंकाळी सुनावणी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT