kokan train 
मुंबई

अरे वाह! मान्सूनसाठी कोंकण रेल्वे सज्ज; लवकरच लागू होणार वेळापत्रक.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मध्य रेल्वेची कोंकण रेल्वे वाहतूक सुद्धा बंद होती. दरम्यान जीवनावश्यक वस्तू आणि श्रमिकांच्या घरवापसीचे काम कोंकण रेल्वेने केले आहे. सामान्य प्रवासी सेवा बंद असल्याने, यादरम्यान कोंकण रेल्वेने मात्र, मान्सूनपुर्व रेल्वे देखभाल दुरूस्तीची कामे पुर्ण केले असून दरवर्षीप्रमाणे पावसाळी वेळापत्रक यावर्षी 10 जुन ते 31 आॅक्टोंबर पर्यंत लागू राहणार असले तरी, या मार्गांवर मात्र रेल्वे मंत्रालयाने ठरवून दिलेल्याच स्पेशल ट्रेन धावणार आहे. 

कोंकण रेल्वे मार्गांवरील समृद्ध निसर्ग आणि कोंकण बघायला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र यावर्षी ऐन पावसाळ्यापुर्वीच कोरोनाची माहामारी सुरू झाल्याने पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. कोंकण रेल्वे मात्र, नेहमीप्रमाणे आपली मान्सुन पुर्व कामे पुर्ण करून, रेल्वे मार्गावर कुठेही पाणी तुंबू नये याची खबरदारी घेतली आहे. विद्युत पोल, रेल्वे मार्गांवरील वाढलेली झाडांची कटाई आणि रुळांची दुरूस्ती असे सर्व कामे पुर्ण करण्यात आली आहे.

पावसाळ्यात कोंकण रेल्वे मार्गांवरील प्रवाशांचा प्रवास सुरक्षीत करण्यासाठी 974 रेल्वे कर्मचारी 24 तास पेट्रोलिंग साठी तैनात केले जाणार आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे कडून कोलाड ते ठोकूर दरम्यान 740 किलोमीटर मध्ये मान्सुन पुर्व कामांची सुरूवात करण्यात आली होती. दरम्यान दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्यात आल्या आहे. 

 आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशिन्स सारखी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहेत. मुसळधार पाऊस पडत असताना रेल्वेचा वेग ताशी 40 किमी असावा अशा सूचना लोकोपायलटला देण्यात आल्या आहे. तर आपत्कालीन स्थितीत मदतीकरिता अँसिडेंन्ट रिलीफ मेडिकल व्हॅन रत्नागिरी आणि वेरना गोवा इथे तैनात ठेवण्यात आल्या आहे.

लोकोपायलट  आणि गार्ड ना वॉकी टॉकी यंत्रणा पुरवण्यात आल्या आहेत . तर मार्गावर पूर्वी पासून प्रत्येकी एक किलोमीटर अंतरावर संपर्क यंत्रणा मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तपासून सज्ज करण्यात आली आहे.

9 स्थानकांमध्ये पर्जन्य मापक यंत्रणा:

मुसळधार पावसाच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याची खबर देणारी यंत्रणा रेल्वे मार्गावरील तीन पुलांवर सुसज्ज आहे . पुराचे पाणी धोकादायक पातळीच्या वर आल्यास हि यंत्रणा अलर्ट करते . याचबरोबर माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली ,मडगाव , कारवार , भटकळ , आणि उद्दपी येथे पर्जन्य मापक यंत्रणा 9 स्थानकात बसविण्यात आली आहे. ज्यामूळे अतिवृष्टी काळात हि यंत्रणेद्वारे आपात्कालीन परिस्थितीच्या सुचना मिळणार आहे.

konkan railway starts soon read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT