मुंबई

अबब...एवढा माेठा मासा जाळ्यात?

अभय आपटे

रेवदंडा : मुरूड-जंजिरा तालुक्‍यातील साळाव येथील मच्छीमारांच्या जाळ्यात गुरुवारी पहाटे भला मोठा मासा सापडला... या लाखोंच्या लॉटरीमुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला... परंतु तो संरक्षित आणि दुर्मीळ प्रजातीतील देवमुशी नावाचा मासा असल्याची माहिती मिळाल्यानंतर मच्छीमारांनी त्याला पुन्हा समुद्रात सोडून जीवदान दिले. 

धक्कादायक : म्हणली मुलांना कपडे घेउन येते...

साळाव नाका येथील मच्छीमार मनोहर साळावकर (53) हे जेजुरी नौकेतून कुंडलिका खाडीच्या पुढे समुद्रात अविनाश सारंग आणि सुनील खेदू यांच्या साथीने मासेमारी करत होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या जाळ्यात एक भला मोठा मासा सापडला. त्यामुळे लाखोंची कमाई होईल या विचाराने ते खूपच आनंदित झाले. ते त्याला घेऊन रेवदंडा जेट्टीवर आले. त्या वेळी सकाळच्या लख्ख उजेडात आपल्याला सापडलेले घबाड हे साधेसुधे नाही, हे त्यांच्या लक्षात आले. जेट्टीवरील उपस्थित मच्छीमारांनीही हा मासा "देवमुशी' (बहिरी) असून तो संरक्षित जीवांपैकी आहे, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी पैशांचा मोह सोडून त्याला साडेनऊ वाजताच्या सुमारास पुन्हा समुद्रात सोडले. 

हा मासा ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर असतो. तो बदलत्या हवामानामुळे गुजरात आणि महाराष्ट्र किनारी कधी तरी येतो, असे मच्छीमारांनी सांगितले. 

"देवमुशी'ला पाण्यात सोडले, त्या वेळी त्याने पाण्यात उसळी मारली. त्यानंतर तो खोल समुद्रात निघून गेला. तो सुमारे 15 ते 20 फूट लांब होता. त्याचे वजन अंदाजे 1500 किलो होते, असे मच्छीमार साळावकर यांनी सांगितले. 

याबाबत गुजरातमधील मत्स्य-अभ्यासक चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियातून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर हा मासा आला असावा. तो आक्रमक असतो. उसळी मारताना नौकेची नासधूस करू शकतो. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर त्याचे प्रमुख भक्ष्य कोळंबी असते. तो रत्नागिरी किनाऱ्यापर्यंत पोहोचतो. 

देवमुशी माशाची जाळ्यातून सुटका केली, त्या वेळी त्यांनी मारलेली उडी ही थक्क करणारी होती. सुमारे 33 वर्षांच्या मच्छीमार व्यवसायातील हा वेगळा अनुभव होता. 
- मनोहर साळावकर, मच्छीमार, साळाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: शिवसेना काँग्रेससोबत विलीन होणार का? उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर देत विषयच संपवला!

Mumbai News: मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! भेसळयुक्त मिठाई-माव्याचा मोठा साठा उघड; तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

Footpath Rights: फुटपाथवर चालणे हा मूलभूत अधिकार; वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या हक्काला प्राधान्य, सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला सुनावले

संजय दिना पाटील शिंदेंच्या संपर्कात, हे उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, मनसेनच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Latest Marathi News Live Update: शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पक्षाच्या ६० व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती

SCROLL FOR NEXT