Mhada sakal
मुंबई

मानखुर्दमधील विजेत्यांना सदनिका किंमत भरण्याची अखेरची संधी

रक्कम न भरल्यास सदनिका वितरण होणार रद्द

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत मानखुर्द येथील 2018 मध्ये काढलेल्या सदनिका सोडतीमध्ये विजेत्या ठरलेल्या विजेत्यांना मंडळाने पैसे भरण्यासाठी अखेरची संधी दिली आहे. विजेत्यांना देकरपत्रात दिलेल्या मुदतीमध्ये पैसे न भरल्यास सदनिकेचे वितरण रद्द करण्याचा इशारा, मुंबई मंडळाचे उपमुख्य अधिकारी यांनी दिला आहे.

मुंबई मंडळाने डिसेंबर 2018 मध्ये एक हजार 384 घरांची सोडत काढली होती. या सोडतीमध्ये संकेत क्रमांक 352 क्रमांकाच्या पीएमजीपी मानखुर्द येथील 265 घरांचा समावेश होता. मात्र सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या अर्जदारांना घराचा ताबा अद्याप मिळालेला नाही. कोरोना काळात महानगरपालिकेने ही घरे क्वारंटाइन सेंटर म्हणून ताब्यात घेतली होती.

गेल्या काही दिवसांपूर्वी हि घरे पुन्हा महानगरपालिकेने म्हाडाच्या ताब्यात दिली आहेत. मात्र क्वारंटाइन सेंटरमध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी येथे तोडफोड केल्याने घरांचे नुकसान झाले आहे. हि घरे सुस्थितीत करून देण्याची मागणी म्हाडाने पालिकेकडे केली होती. त्यानुसार महापालिकेने या घरांची दुरुस्ती करून पुन्हा म्हाडाकडे दिली आहेत.

यानंतर मंडळाने मानखुर्द येथील विजेत्या अर्जदारांना सुधारित देकरपत्र पाठवले आहे. त्यानुसार विजेत्यांना सदनिकेची विक्री किमतीचे 25 टक्के रक्कम 30 दिवसात आणि शिल्लक रक्कम पुढील 60 दिवसात भरण्याची मुदत दिली आहे. दिलेल्या मुदतीमध्ये विजेत्यांनी रक्कम न भरल्यास त्याच्या सदनिकेचे वितरण रद्द करण्यात येईल, असे उपमुख्य अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुणे पोलिस आयुक्तालयात दोन नवीन परिमंडळे, पाच नवीन पोलिस ठाणी मंजूर!

IND vs SA: बुमराहपाठोपाठ हार्दिकचीही खास सेंच्युरी! 'असा' पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय ऑलराऊंडर

Maharashtra Sand Mafia: वाळू माफियाविरोधात मोठी कारवाई लवकरच! मुख्यमंत्र्यांचे ठाम आश्वासन, काय म्हणाले?

Who Is Nitin Nabin: दिल्लीच्या राजकारणात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन कोण?

Lionel Messi: मेस्सीसाठी स्वागत, पण भारतीय खेळाडूंची ओळख पुसली! भारतीय फुटबॉलसाठी धक्कादायक क्षण

SCROLL FOR NEXT