मुंबई

आज आढळलेत 409 नवे कोरोना रुग्ण, मुंबईतील दररोजची कोविड रुग्णसंख्या पाचशेच्या आत

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 16 : मुंबईत आज 409 नवे रुग्ण आढळले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 70 हजार 113 इतकी झाली आहे. आज मुंबईत 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10 हजार 582 वर पोचला आहे. आज 529 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 45 हजार 774 रूग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 91 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 274 दिवसांवर गेला आहे. तर 15 नोव्हेंबरपर्यंत एकूण 16 लाख 89 हजार 205 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 9 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.25 इतका आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 12 मृत्यूंपैकी 11 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 11 पुरुष तर 1  महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 12 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षाखाली होते. तर 4 रुग्ण 40 ते 60 वर्षादरम्यान होते. 7 रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते. 

मुंबईत 467 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5 हजार 707 इतकी आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 3 हजार 816 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड केअर केंद्रात दाखल करण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 401 अतिजोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.  

less than five hundred corona patients detected from mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 1 एप्रिलला बँका सुरू की बंद? बँकेत जाण्याआधी RBI काय सांगते नक्की जाणून घ्या

Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

Anand Mahindra: लोक हसले, पण तो काम करत राहिला! एका मुलाने स्वच्छ केली संपूर्ण नदी, आनंद महिंद्रा यांनीही केले कौतुक

Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा बँकेचे नामांतर अडकले रिझर्व्ह बँकेकडे; जिल्ह्याचे नामकरण होऊन तीन वर्षे उलटली तरी प्रस्तावाला मंजुरी मिळेना

Latest Marathi News Live Update : माजी खासदार हेमंत गोडसे वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT