sanitizer
sanitizer 
मुंबई

सावधान! किराणा मालाच्या दुकानात सॅनिटायझरची विक्री करताय? आधी ही बातमी वाचा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : किराणा दुकानातून परवानगीविना सॅनिटायझरची सर्रास विक्री केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर व्यापारी असोसिएशनने वेळीच निर्बंध घालावेत, तसेच रीतसर परवानगी घेऊनच विक्री करावी; अन्यथा संबंधित दुकानाचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना देण्यात आला आहे. 

कोरोना विषाणूपासून बचावासाठी सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. त्याचा गैरफायदा घेत काही व्यापारांकडून विनापरवानगी सॅनिटायझरची विक्री केली जात आहे. दरम्यान, औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यात कलम 18 क नुसार सॅनिटायझरची साठवणूक, फार्मासिस्टशिवाय किरकोळ, घाऊक विक्रीसाठी परवाना नमुना 20 अ, 20 बीची तरतूद आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करून रीतसर परवानगी घेणे अनिवार्य आहे. मात्र आता कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे सर्रास उल्लंघन करून शहर व जिल्ह्यातील किराणा दुकानदार सॅनिटायझर विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने अन्न व औषध प्रशासनाने कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

दुकानदारांनी विनापरवाना सॅनिटायझरचा साठा करून ठेवणे, विक्री करणे कायद्याने गुन्हा ठरतो. अशा विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे दुकानदारांनी विनापरवाना सॅनिटायझरचा साठा करून विक्री थांबवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

License revoked if selling unlicensed sanitizer, warning traders

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT