Lift Sakal
मुंबई

मालाड : लिफ्टमध्ये अडकल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास परिसरातील इमारत क्रमांक १३ येथे ही घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

मालाड : मालाड (Malad) पश्चिमेतील भुजाले तलाव परिसरातील इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकल्याने १२ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू (Death) झाला. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास परिसरातील इमारत क्रमांक १३ येथे ही घटना घडली. या इमारतीत लिफ्ट (Lift) दुरुस्तीचे काम सुरू आहे. तिसऱ्या मजल्यावर राहणारे उदय राय यांचा १२ वर्षीय नातू त्याच्या आईसोबत शाळेतून घरी आल्यावर त्याने नेहमीप्रमाणे दुरुस्ती सुरू असलेल्या या लिफ्टमध्ये एक पाय ठेवला.

त्यानंतर अचानक लिफ्ट सुरू झाली. यावेळी एकाने मुलाला तातडीने बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत लिफ्ट वर गेल्याने मुलगा लिफ्टमध्ये अडकून गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी मुलाला तातडीने चिंचोली बंदर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डाॅक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरू असताना खबरदारी म्हणून लिफ्टचे दार लॉक करण्याची गरज होती; मात्र लिफ्टचा दरवाजा उघडाच असल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. तसेच, लिफ्टचे काम करताना सफेद व लाल रंगाच्या पट्ट्या लावणे आणि फलक लावणेही गरजेचे आहे; मात्र दुरुस्ती सुरू असताना फलक व पट्ट्याही लावले नसल्याचे समजते आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT