Neel yoga mall 
मुंबई

Mumbai News : मॉलमध्ये खेळताना घडला अनर्थ, चिमुरडीचा मृत्यू!

मुंबईतील एका प्रसिद्ध मॉलमध्ये ही दुर्घटना घडली. काय घडलंय नक्की जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रविवारचा सुट्टीचा दिवस.... आई-बाबांसोबत मॉलमध्ये फिरायला जायची त्या चिमुरडीची लगबग.... मॉलमध्ये पोहोचल्यानंतर लाडक्या लेकीला झालेला आनंद पाहुन तिच्या मात्यापित्याच्या चेहऱ्यावर दिसत असलेलं समाधान......पण मॉलमधल्या प्ले एरियात खेळत असताना काही वेळातच असं काही घडलं की त्यांच्या काळजात धस्स झालं...... क्षणाधार्त या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील समाधानाची जागा भीतीनं घेतली......कारण त्यांची लाडकी चिमुकली घसरगुंडीवरुन खाली पडली अन्.....(Little girl died after falling from slide in the play area of Mumbai Neel Yoga mall)

आई-वडिलांसोबत घाटकोपरमधील 'नील योग मॉल'मधील झेनोक्स प्ले स्पेस याठिकाणी खेळण्यासाठी गेलेल्या एका साडेतीन वर्षीय मुलीचा घसरगुंडीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी चेंबूर येथे घडली. याबाबत पंतनगर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

मॉलमध्ये नक्की काय घडलं?

दालीशा वर्मा असं मृत्यू झालेल्या चिमुरडीचं नाव असून ती चेंबूरच्या टिळक नगर परिसरात राहत होती. रविवारी सायंकाळी ती आई-वडिलांसोबत नील योग मॉलमध्ये खेळण्यासाठी गेली होती. इथल्या घसरगुंडीवर खेळत असताना अचानक तिचा तोल जाऊन ती खाली पडली. यावेळी तिला चक्कर आली आणि बेशुद्ध पडली. त्यानंतर तत्काळ तिला मुलुंडच्या फोर्टीज रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयानं जाहीर केलं.

मॉलचं म्हणणं काय?

मुलांना सुरक्षेच्या कारणास्तव अशा विविध किड्सझोनमध्ये पालक घेऊन जातात. मात्र, झेनॉक्स प्ले स्पेस मध्ये मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळं झेनॉक्स प्ले स्पेसचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, झेनॉक्स प्ले स्पेसचे मालक रचना हारिया यांनी या ठिकाणी सुरक्षेच्या पूर्ण उपाययोजना केल्या असल्याचं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT