मुंबई

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर टांगती तलवार

कृष्ण जोशी

मुंबई  : राज्य आणि रेल्वे प्रशासनाच्यावतीने लोकल प्रवास करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती समोर आली आहे. विनामास्क किंवा व्यवस्थित मास्क न घातलेल्या प्रवाशांना पकडल्यास सरकारी, महापालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून, ओळखपत्र दाखून दंड न भरता स्थानकात प्रवेश करत आहेत. सुमारे 80 टक्के अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी विनामास्क फिरताना सापडत आहेत, अशी माहिती स्थानकावर कर्तव्य बजाविण्याऱ्या क्लिनिक मार्शलच्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर टांगती तलवार असल्याची भूमिका प्रवासी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली.

राज्य सरकार, रेल्वे प्रशासन, महापालिका प्रशासनाद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर नियमावली तयार केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी मास्क वापरणे, गर्दीचे नियोजन करणे, या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी क्लिनिक मार्शल पथकाची नियुक्ती केली आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांऐवजी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच विनामास्क सापडत असल्याची माहिती दादर रेल्वे स्थानकावरील क्लिनिक मार्शल कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी क्लिनिक मार्शल पथकासाठी डोकेदुखी झाली आहे.

विना मास्क किंवा व्यवस्थित मास्क न घातलेल्या प्रवाशांकडून 200 रुपये दंड आकारला जात आहे. मात्र, 20 टक्के सर्वसामान्य प्रवासी आणि 80 टक्के अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी विना मास्क प्रवास करत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास ओळखपत्र दाखवून क्लिनिक मार्शलबरोबर भांडणे होत असल्याचे प्रकार दररोज घडत आहेत. 

सीएसएमटी आणि दादर येथील महिला क्लिनिक मार्शल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, विना मास्क लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे आदेश आहे. मात्र सर्वसामान्य प्रवाशांपेक्षा मंत्रालय, मुंबई महापालिका, पोलीस, रेल्वे इतरही शासकीय कर्मचारी विना मास्क प्रवास करत आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास शासकीय ओळखपत्र दाखवून आम्हाला सोडण्याची विनंती करतात. त्यानंतर या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्राचा फोटो काढून ठेवला जातो. मात्र, ते दंड भरत नाहीत. तर, काही कर्मचारी दंड भरून जातात. दररोज सुमारे 80 टक्के अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी विनामास्क भेटत आहेत.

रेल्वे परिसरात दाखल होणाऱ्या विनामास्क प्रवाशांवर महापालिकेच्या मदतीने कारवाई केली जात आहे. विनामास्क कोणताही प्रवासी असो, त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
- शिवाजी सुतार,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

1 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीपर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील एकूण 3 हजार 437  प्रवाशाना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 8 लाख 6 हजार 900 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण 2 हजार 200  प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 21 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

----------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane  )

local train mumbai marathi news update ordinary public not allow latest update

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मुश्रीफ गटाला पुन्हा धक्का, मुरगुडमध्ये सत्ता समीकरण बदलले

Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार! निकालाआधीच काँग्रेसनं केलं मान्य अन् कारणही सांगितलं..

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

जालन्यात काँग्रेस नेत्याच्या पुतण्यानं संपवलं आयुष्य, कारमध्ये गोळी झाडून घेतली

Epstein Files Missing : अमेरिकेत खळबळ! 'जेफ्री एपस्टाईन'शी संबंधित फाईल्स गायब; २४ तासांत ट्रम्पचा फोटोही डिलीट

SCROLL FOR NEXT