मुंबई

पेला इथेच का ठेवला किंवा कपड्यांची अशीच का घडी घातली, तिच्या आणि त्याच्या भांडणात वड्याचं तेल वांग्यावर...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनच्या दोन महिन्यात सतत एकमेकांसोबत राहील्याने उणिवा कळल्या. यामुळे पेला इथेच का ठेवला किंवा कपड्यांची घडी अशीच का घातली अशा लहान लहान गोष्टींवरुन घरात वाद होऊ लागले असून काही घरात तर किरकोळ कारणांवरुन हाणामारीही होऊ लागली आहे.

लॉकडाऊनच्या काळात सतत घरी राहील्यामुळे मानसिक आरोग्यावर परीणाम होत आहे. त्यातून लहान लहान गोष्टीची चिड येऊन घरात भांडणाचे प्रकार घडू लागले आहेत असं KEM रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ.शुभांगी पारकर यांनी सांगितले. फक्त शारीरिक हिंसाच नाही तर एकमेकांना टोमणे मारणे असेही प्रकार घडत असल्याचे डॉ.पारकर यांनी सांगितले. लॉक डाऊनच्या काळात असे प्रकार जेवढे उघड झाले आहेत त्यापेक्षा अनेक पटीने असे प्रकार बाहेर आलले नसावेत अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केलीये. 

आधी वेळ देता येत नव्हता आता अतीवेळ एकमेकांसोबत...  

या आधी लग्न झालेल्या जोडप्यांना कामाच्या रगाड्यात एकमेकांना वेळ देता येत नव्हता. मात्र आता गेले काही महिना पूर्णवेळ घरी असल्यानं एकमेकांच्या उणिवा स्पष्ट दिसू लागल्या आहेत. त्यावरुनच घरात वाद होतायत असं निरीक्षणही मानसोपचार तज्ञ नोंदवतात.

वड्याचं तेल वांग्यावर... 

या भांडणांमध्ये घरातील जेष्ट नागरीक आणि लहान लहान मुलं सॉफ्ट टार्गेट ठरतायत. नवरा बायको यांच्यामधील भांडणाचा राग लहान मुलांवर निघून त्यांना मारहाणीच्या घटनाही वाढल्या आहेत. तर जेष्ट नागरीकांना अनेक वेळा टोमणे ऐकावे लागतायत

एकाकी पडल्याची भावना...

जेष्ट नागरीक दिवसातील काही वेळ न चुकता त्यांच्या मित्र परीवारा बरोबर व्यथित करतात. मात्र, दोन महिने ते घराबाहेर पडू शकले नाहीत. तसेच आताही जेष्ट नागरीकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला गेलाय. अशामुळे या जेष्ट नागरीकांमध्ये एकाकी पडल्याची भावना निर्माण झाली आहे. 

lockdown and its impact on mental health read what psychologist are saying

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

"माझ्या सासूबाईंचा मला खूप सपोर्ट मिळाला" माधुरीने केलं सासरच्यांचं कौतुक

Ranjani Cable Theft Case: रांजणीच्या खडकवाडीत केबलचोरीचा कहर; ५५ शेतकऱ्यांचे सहा लाखांचे नुकसान, पोलिस तपासाची मागणी तीव्र

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

SCROLL FOR NEXT