मुंबई

लॉकडाऊनमुळे ऑनलाईन गेमिंगला पसंती

उत्कर्षा पाटील

मुंबई : लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळलेली तरुणाई करमणुकीचे साधन म्हणून ऑनलाईन गेमकडे वळली आहे. त्यामुळे मागील 20 दिवसांत ऑनलाईन गेमच्या मागणीत 40 ते 50 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. पबजी, स्पार्टन पोकर, ल्युडो किंग, कॅण्डी क्रश, रमी या खेळांच्या वापरकर्त्यांमध्ये 20 ते 30 टक्‍क्‍यांची भर पडली आहे. 

लॉकडाऊनमुळे घरातच असलेल्या जवळपास प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आहे. त्यामुळे समाजमाध्यम, ऑनलाईन गेमिंग आदी माध्यमांतून मित्र-मैत्रिणींशी संवाद साधला जात आहे. आतापर्यंत युवावर्गातच क्रेझ असलेल्या ऑनलाईन गेमिंगकडे प्रौढ व्यक्तीही मोठ्या प्रमाणात वळल्या आहेत. या "मोठ्या' गेमर्सची संख्या 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे सांगितले जाते. 

भारतात ऑनलाईन गेमिंग 10 वर्षांपासून असले, तरी मागील एक-दोन वर्षांतच "युजर्स' लक्षणीय प्रमाणात वाढले आहेत. प्रत्येकाकडे असलेला स्मार्टफोन, समाजमाध्यमाची उपलब्धता, वेगवान इंटरनेट आदी सुविधांमुळे ऑनलाईन गेमिंग व्यवसाय भरभराटीला आला आहे. आता ऑनलाईन गेममध्ये वैविध्याची मागणी होत असल्याचे "स्पार्टन पोकर' या ऑनलाईन गेमिंग पोर्टलचे व्यवस्थापकीय संचालक अमिन रोझानी यांनी सांगितले. 

ऑनलाईन गेम व्यवसायात भारत अजून मागे असला, तरी भविष्यात येथील बाजारपेठ झपाट्याने विकसित होणार आहे. ऑनलाईन गेमर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तंत्रज्ञान विकसित होत असून, या क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. 
- अमित रोझानी, 
संचालक, स्पार्टन पोकर  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

SCROLL FOR NEXT