Lockdown Sensex
Lockdown Sensex E Sakal
मुंबई

'लॉकडाउन'च्या गोंधळानंतर सेन्सेक्सची उच्चांकावरून घसरण

कृष्णा जोशी

चांदीचे भाव घसरले; सोनं मात्र महागलं

मुंबई: राज्यातील लॉकडाउन उठवला जाणार या चर्चेनंतर काल दिवसअखेरीस उच्चांकावर बंद झालेला शेअर बाजाराचा निर्देशांक आजच्या दिवसभरात त्या पातळीवर टिकून राहू शकला नाही. लॉकडाउनबद्दलच्या संभ्रमाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. त्यामुळेच दिवसभराच्या व्यवहारात 52,389 पर्यंत मजल मारलेला सेन्सेक्स त्या पातळीवर न टिकता दिवसअखेर 132 अंशांनी घसरून 52,100 अंशांवर स्थिरावला. निफ्टीदेखील 20 अंशांनी घसरून 15,670 अंशांवर बंद झाला. काल मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने देखील बंद स्तरावरचा सर्वकालिक उच्चांक (52,232) नोंदविला होता. (Lockdown Confusion in Maharashtra Share Market Sensex down by 132 points)

आजच्या दिवसभराच्या उलाढालीत नेस्ले, स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अँक्सीस या बँकांच्या निर्देशांकात एक ते दोन टक्के घसरण झाली. तर टायटन, हिंदुस्थान लीव्हर, रिलायन्स (बंद भाव 2,190 रु.), डॉ. रेड्डीज यांचे दरही पाऊण ते एक टक्क्याने घसरले. बजाज फिनसर्व्ह, ओएनजीसी, लार्सन टुब्रो (1,537 रु.), बजाज फायनान्स व एचडीएफसी या समभागांचे दर मात्र दीड ते तीन टक्के वाढले.

सोन्या-चांदीचे दर (तुलना)

सोने - 10 ग्रॅम (24 कॅरेट)

आजचा दर - 48,960 रुपये

कालचा दर - 48,570 रुपये

चांदी (1 किलो)

आजचा दर - 70,800 रुपये

कालचा दर - 72,000 रुपये

(संपादन- विराज भागवत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT