birds 
मुंबई

दुर्दैवी..! पाणी-चाऱ्याविना पशू-पक्ष्यांची तडफड

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनचा तडाखा मुक्या पशू-पक्ष्यांनाही बसत आहे. पाणी आणि अन्नाविना तडफड सुरू असलेल्या या मुक्‍या जिवांना वाचवण्यासाठी प्राणीप्रेमी धडपडत आहेत. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने हॉटेले, मॉल, कंपन्या, शाळा, मंदिरे बंद झाली आहेत. प्राणी आणि पक्ष्यांना अन्न-पाणी मिळण्याचे अनेक स्रोत बंद झाले आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पक्षी आणि प्राण्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे डिहायड्रेशनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे. भटके श्‍वान आणि मांजरांना काही नागरिक खाण्यासाठी देत असले, तरी पाण्यासाठी मात्र वणवण करावी लागत आहे. प्राणी-पक्ष्यांची उपासमार सुरू आहे. डिहायड्रेशमुळे अनेक पक्षी जमिनीवर कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. प्राणीमित्र संघटनांना दररोज 20 ते 25 रेस्क्‍यू कॉल येत असल्याचे सांगितले जाते. 

घार, पोपट, कबूतर, घुबड, कावळे आणि चिमण्या आदी पक्षी वाढत्या उष्णतेमुळे हैराण असून, अन्नपाणी न मिळाल्याने अशक्तपणा आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवत आहे. भटके कुत्रे आणि मांजरांनाही असा त्रास होत आहे. असे पक्षी व प्राण्यांना रुग्णालयात आणल्यानंतर ग्लुकोजचे पाणी आणि मल्टिव्हिटामिन देण्यात येते. काही तास निरीक्षणाखाली ठेवून त्यांना सोडून देण्यात येते. सध्या परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात 32 पक्ष्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. जे. सी. खन्ना यांनी दिली 


अशी घ्या काळजी 

  •  इमारतीच्या गच्चीवर पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवा. 
  •  घराच्या खिडकीत भांडे अडकवू धान्य व पाणी ठेवा. 
  •  इमारतीच्या परिसरात प्राण्यांसाठी पाणी ठेवा. 
  •  भुकेल्या प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था करा. 
  •  अन्न आणि पाणी ठेवलेली भांडी स्वच्छ ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Impact: पेट्रोल-डिझेल महागलं… आता होम लोन आणि EMI वरही बसणार मोठा फटका!

IAS पद्मा जयस्वाल कोण? २३ वर्षे सेवेनंतर बडतर्फ, राष्ट्रपतींनी कारवाईला दिली मंजुरी

MI च्या इतिहासातील एक पर्व संपलं! १६ वर्षांपासून संघासोबत असलेल्या दिग्गजाने, MI ला ठोकला रामराम

Gold Rate Today: सोन्या-चांदीत मोठी घसरण! सोनं 11 हजार तर चांदी 30 हजारांनी स्वस्त; काय आहे ताजा भाव?

२-३ वर्षे तयारी, लाखो रुपये खर्च; पेपरफुटीने NEET परीक्षा रद्द, ३ विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT