boharni 
मुंबई

लॉकडाऊनमुळे धारावीतील बोहारणींना भविष्याची चिंता  

सकाळवृत्तसेवा

धारावी : जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. मुंबईतील रुग्णही वाढत चालले आहेत. लघुउद्योगाची नगरी अशी ओळख असलेल्या धारावीतही कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. संचारबंदीमुळे आधीच इथले व्यवसाय कोलमडून गेले होते. आता रुग्ण वाढू लागल्याने धारावीतील हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांचे हाल सुरू आहेत. जुने कपडे घेऊन भांडे देणाऱ्यांना अर्थात बोहारणींना घरातच बसावे लागत असल्याने त्यांना आर्थिक समस्या भेडसावू लागली आहे. 

धारावीत केला वखार विभागात वाघरी वाडा नावाची वस्ती आहे. वाघरी समाजाची मंडळी मूळची गुजरात राज्यातली, परंतु पोटापाण्यासाठी अनेक वर्षांपासून ती धारावीत वास्तव्य करून आहेत. वाघरी समाजाची 250 कुटुंबे इथे राहतात. मुंबईभर फिरून ते जुने कपडे घेऊन त्या बदल्यात नवीकोरी भांडी देतात. जुने कपडे स्वच्छ धुऊन चोर बाजारात विकतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील सर्व व्यवहार बंद आहेत. त्याची झळ त्यांनाही बसली आहे. गाठीशी असलेले पैसे खर्च करून त्यांनी वीस-बावीस दिवस कसेबसे ढकलले. मात्र, आता तेही संपल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. धारावीत सध्या सामाजिक संस्था वा राजकीय पक्षांकडून मिळणाऱ्या मदतीवर आलेला दिवस ढकलावा लागत आहे. 

वस्तीतील संस्था स्थानिक राजकीय पक्षांनी खाण्याची व अन्नधान्याची व्यवस्था केली असल्याने त्यांना आधार मिळाला आहे. मात्र, संचारबंदी उठली नाही तर काय करायचे, अशा विचाराने त्यांची झोप उडाली आहे. 

विचार करून डोके बधिर झालेय! 
जेव्हा लॉकडाऊन संपलेले असेल तेव्हा आमच्या व्यवसायावर त्याचा काय दुष्परिणाम होतील याचा विचार करून डोके बधिर झाले आहे, अशी कैफियत व्यावसायिक विनोद वाघरी यांनी मांडली. "आम्ही मुंबईतील अनेक विभागांतील गाल्लीबोळात फिरून आमचा व्यवसाय करतो. कोरोनामुळे पुढे आम्हाला आमचा व्यवसाय करता येईल का? असा प्रश्‍न भेडसावत आहे, अशी प्रतिक्रिया बोहारीण असलेल्या वैशाली दंतानी सतनिक यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSRP number plate Fake : बनावट एचएसआरपी नंबरप्लेट कारखान्यावर छापा, यंत्रसामग्री जप्त; एकास अटक

Water Project : खडकवासला ते फुरसुंगी पाणी प्रकल्पचा एक किलोमीटर बोगदा पूर्ण; चार ठिकाणी खोदाई

Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल, कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज, तुमच्या भागांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : दिग्दर्शक नीरज पांडे यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

मोठी बातमी! ३१ डिसेंबर २०२६ रोजी ६ वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार इयत्ता पहिलीत प्रवेश, अंतिम सत्र परीक्षा १५ एप्रिलनंतर होणार, वाचा...

SCROLL FOR NEXT