मुंबई

लॉकडाऊन वाढला, सामान्यांचे बजेटही कोलमडले... 

मयूरी चव्हाण-काकडे

डोंबिवली : कोरोना विषाणूमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले असून सर्वांचाच आर्थिक गाडा घसरला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र वाढलेल्या या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

कुटूंबातील आर्थिक स्त्रोत थंडावल्याने तिपटीने, पाचपटीने वाढलेल्या भाजी व किराणा मालाच्या किमती पाहून सर्वसामान्यांचे डोळे विस्फरले आहेत. कल्याण-डोंबिवली शहरात तर यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. 

लॉकडाऊन घोषित होताच जीवनावश्यक वस्तूंच्या भावात कोणतीही दरवाढ केली नसल्याचे सांगत सरकारने नागरिकांना दिलासा दिला होता. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी जसजसा वाढत गेला तसतसे दुकानदारांनी हळूहळू भाववाढ केली. मालवाहतूक ठप्प असून कामगारही मिळत नाहीत. परिणामी डाळींच्या किमतीतही सुमारे 20 ते 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

घाऊक बाजारातही डाळींची आवक कमी झाली असल्याने डाळींचे भाव वाढल्याचे दुकानदार जयेश पाटील यांनी सांगितले. ज्या वस्तूंवर किमती छापील आहेत त्यांचे पैसे तितकेच आकारले जातात. मात्र इतर सुटा किराणा घेताना वाढत्या किमतीबाबत विचारणा केली असता ग्राहकांना दुकानदारांकडून उत्तरे दिली जातात. सद्यपरिस्थितीत ग्राहकांचाही नाईलाज असल्याने जादा पैसे देऊन आला दिवस ढकलण्याचा पराक्रम नागरिकांना करावा लागत आहे. 

अशी झाली वाढ
   100 रुपये प्रतिकिलो असणारी मूगडाळ आता 140-150 रुपयांना तर 100 रुपये किलो असणारी मटकी 150-160 दराने विकली जात आहे. उडीद डाळीच्या किमतीत 15 ते 30 रुपये तर तूरडाळीचे दरही 10 ते 20 रुपयांनी वाढल्याचे चित्र आहे.

ठोक विक्रेत्यांकडून माल येत नाही. मालवाहतुकीसही अडचणी येत असल्याचे दुकानदार सांगतात. धान्य साठा मुबलक प्रमाणात असूनही काही दुकानदार अपुऱ्या मालाची कारणे देत ग्राहकांची लूट करत आहेत.
- नमिता देसाई, गृहिणी

किराणा मालाच्या आधीच्या व आताच्या किमती (प्रतिकिलो)

साखर       35-42 
तेल           95-120 
शेंगदाणे     90-130
साबुदाणा   70-80 
खोबरे        170-200 

भाजीपाल्याच्या आधीच्या व आताच्या किमती (प्रतिकिलो) 

भेंडी      40-70
टोमॅटो   20-30
वांगी     10-30
मिरची   40-70 
आलं     60-80 
लसूण   120-160

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT