मुंबई

३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार, मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा....

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रातील लॉकडाऊन  कधी उठणार अशा चर्चा जोर धरतायत. अशात आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. कारण आणखी १५ दिवस, १४ एप्रिल पासून पुढील १५ दिवस म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवला जाणार आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करणार असल्याची माहिती समोर येतेय.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या मीटिंगमध्ये देशातील सर्वच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवावं अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलीये. उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवावा याचसोबत महाराष्ट्रात आर्थिक मदत पुरवली जावी ही मागणी नरेंद्र मोदींकडे केलेली आहे.  

येत्या १४ एप्रिल रोजी देशातील लॉकडाऊन संपुष्टात येतोय. अशात आज पंतप्रधानांकडून सर्व देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्यास परवानगी दिल्याबद्दल ट्विटरवरून आभार मानलेत. यावरून देशातील आणि अनुषंगाने महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार हे स्पस्ट होतंय.

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. अशात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा हजारीपार गेलाय. दिवसागणिक वाढणारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाच आकडा कमी करण्यासाठी अधिकच्या लॉकडाऊनची नितांत गरज असल्याचं बोललं जातंय.

याच पार्श्वभूमीवर कशा प्रकारे लॉकडाऊन वाढणार, पुढील १५ दिवसांमध्ये सुरु असलेल्या लॉकडाऊन पेक्षा काय वेगळं केलं जाणार हे मुख्यमंत्र्यांच्या संवादातून समोर येणार आहे.       

lockdown in maharashtra to extend till 3oth of april read full report 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT