sanjay.jpg 
मुंबई

लॉकडाऊन का ?कशासाठी? हे प्रश्न चुकीचे आहेत - संजय राऊत

दीनानाथ परब

मुंबई: "कोरोनाच्या संदर्भात कोणीही राजकारण करू नये. लॉकडाऊन का ?कशासाठी? हे प्रश्न चुकीचे आहेत. काल गुजरातमध्ये लॉकडाऊन करा, असं कोर्टाने सांगितलं आहे. पण मुंबईत विरोधी पक्षाला लॉकडाऊन नको होता. पण लोकांचा जीव महत्त्वाचा आहे" असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. "नियम आणि न्याय सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे. मग येडियुरप्पा असो किंवा अनिल देशमुख. अनिल देशमुख यांचा मुद्दा नायल्यात आहे त्यामुळे मी कोणत ही भाष्य करणार नाही. अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. आता निर्णय कोर्ट देईल" असे संजय राऊत म्हणाले. 

"कोरोना  एक  राष्ट्रीय संकट आहे. मेडिकल इमर्जन्सी आहे. कोणत्याही विरोधी पक्षाने संपूर्ण विषयाचं राजकारण करू नये. आरोप-प्रत्यारोप करू नये या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा आहे. एकमेकांना सहकार्य करून व्यक्तींचा विषय मार्गी लावायला हवे" असे संजय राऊत यांनी सांगितले. 

"महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची भूमिका अचानक बदलली आहे. गुजरात मध्ये हायकोर्ट सांगते की, लॉकडाऊन करा. त्यामुळे कुठलेही सरकार आनंदाने लॉकडाउन करत नाही. ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे त्यामुळे आम्हाला लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागला आहे" असे संजय राऊत म्हणाले. "पुढचे काही महिने विरोधी पक्षाने महाराष्ट्राचे सरकारच्या हातात घालून कोरोनाच्या विरोधातली लढाई लढली पाहिजे राजकारण करण्यासाठी उभा जन्म आहे" असे राऊत म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NSE Gold: आता Demat मध्येही ठेवता येणार सोनं! NSE ची नवी डिजिटल गोल्ड योजना सुरू; नेमकं काय आहे EGR?

Anuskura Ghat Road Repair : कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास आता सुसाट! अणुस्कुरा घाटातील 25 किमी रस्त्याचे होणार मजबुतीकरण, 5 कोटींचा निधी मंजूर

सैराट फेम अरबाज शेख अडकला लग्नबंधनात; गर्लफ्रेंडबरोबर गुपचूप उरकला निकाह, होतोय अभिनंदनाचा वर्षाव

Angarki Sankashti Chaturthi 2026: आसपासच्या नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सुरू करा श्रीगणेशाच्या 'या' रक्षा मंत्राचा जप

Latest Marathi News Live Update : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला; बँकिंग क्षेत्रावर दबाव

SCROLL FOR NEXT