मुंबई

लॉकडाउनमुळे राज्यातील वीज वापर घटला; अनलॉकनंतरही विजेच्या मागणीत वाढ नाही

तेजस वाघमारे

मुंबई : राज्यातील वीज वापरला यंदा कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. या वर्षीत जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत राज्यातील एकूण वीज वापर 32301.53 मेगा युनिट्स इतका झालेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वीज वापरात जवळपास 13 टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच अनलॉकनंतरही औद्योगिक आणि व्यावसायिक वीज वापरात लक्षणीय वाढ झाली नसल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या व्यापक आर्थिक दृष्टीकोनाचे विश्लेषण करण्यासाठी वित्त विभागाने अभ्यास केला आहे. याचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात ही वस्तुस्थिती दर्शविली आहे.  लॉकडाउनवरील निर्बंध कमी झाल्यानंतरही व्यावसायिक आणि औद्योगिक वीज वापरात लक्षणीय वाढ झाली नाही. तसेच जानेवारी ते ऑगस्ट 2020 या कालावधीत व्यावसायिक युनिटच्या वीज वापराच्या तुलनेत सुमारे 32 टक्क्यांनी घट झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान, राज्यात व्यावसायिक युनिट्सनी एकत्रितपणे 842.76 मेगा युनिट वीज वापरली होती. याच कालावधीत मागील वर्षी 1,233.82 मेगा युनिट वापरण्यात आली होती.

नवीन वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत सकारात्मक वाढ नोंदविल्यानंतर, व्यावसायिक वीज वापराने मार्च महिन्यात लॉकडाऊनच्या पहिल्या महिन्यात पहिली घसरण घेतली. जवळजवळ 28 टक्क्यांनी वीज मागणी कमी झाली. हे अंतर एप्रिलपर्यंत आणखी वाढून 49 टक्क्यांवर गेले. मे महिन्यात यामध्ये थोडीशी सुधारणा झाली. जुलै अखेर हे अंतर  37 टक्क्यांच्या जवळ राहिले आहे.

ऑगस्टमध्ये राज्यात व्यावसायिक आणि औद्योगिक संस्थांकडून वीज वापराचा वापर 92.91 मेगा युनिट इतका होता. मागील ऑगस्टमध्ये 147.72 मेगा युनिट वीज वापर होता. राज्यात सुमारे 20 लाख व्यावसायिक वीज जोडणी आहेत. या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत औद्योगिक आणि व्यावसायिक युनिटद्वारे वीज वापर जानेवारी ते ऑगस्ट या काळात 17,251.75 मेगा युनिट्स होता. जानेवारी-ऑगस्ट, 2019 मध्ये 22,143.9 मेगा युनिट्स वापर होता. गतवर्षीची तुलना करता यंदा वीज वापरात 22 टक्क्यांनी घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या दरात एका दिवसात मोठी घसरण, चांदीचे भावही झाले कमी; वाचा आजची किंमत

Sarfaraz Khan: धावा न होण्याचे दडपण नाही; सर्फराझ, शैलीत बदलाची गरज नाही, पुरेसा सराव करतोय!

Jalna News: जिल्ह्याला क्षयरोगाचा विळखा; एक हजार ९०७ रुग्ण सक्रिय, मोफत उपचार असूनही रुग्णसंख्या कमी होईना

Ladki Bahin Yojana: नाव कमी होणार नाही? लाडक्या बहिणींसाठी दोन महत्त्वाच्या अपडेट्स; निवडणुकीपूर्वी सरकार घेणार मोठा निर्णय!

शशांक केतकरची मोठ्या पडद्यावर धमाकेदार एंट्री! ‘कैरी’मधील त्याचा लूक रहस्यमय

SCROLL FOR NEXT