मुंबई

LockdownEffect: हमालांवर उपासमारीचे संकट; हाती कामच नसल्याने पोटाची भूक कशी भागवणार

दीपक शेलार


ठाणे ः  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पूर्णतः ठप्प झालेली रेल्वे सेवा अंशतः सुरू झाली. मात्र, लांबपल्याच्या मेल-एक्स्प्रेस अद्यापही पुरेशा संख्येने सुरू न झाल्याचा फटका विविध स्थानकांवरील हमालांना बसला आहे. हाताला कामच नसल्याने हमालवर्ग हवालदिल झाले आहे. सध्या हजारोंच्या संख्येने श्रमिकांचे लोंढे स्थानकात उतरत असले तरी पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याची खंत अशोक कांगणे, भगवान देशमुख, दिगंबर पन्हळकर आदी हमालांनी व्यक्त केली.

नेहमी लाखो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या ठाणे स्थानकात कोरोनामुळे गेले पाच महिने शुकशुकाट आहे. सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा तसेच लांबपल्याच्या बहुतांश गाड्या बंद असल्याने प्रवाशांची वर्दळ कमी आहे. परराज्यातून मजूर राज्यात परतत येत आहेत. मात्र, अनेक प्रवासी त्यांचे साहित्य तेच वाहून नेत असल्याने हमालांना कामच मिळत नाही. त्यामुळे आधीच लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही, त्यात वाढती महागाई असल्याने दैनंदिन उपजीविका कशी करावी, याची विवंचना या हमालांना पडली आहे. 

रेल्वे सहायकच्या नावाखाली उपेक्षाच
ठाणे स्थानकात एकूण 28 हमाल असून लॉकडाऊनपूर्वी दिवसा 14 आणि रात्रपाळीत 14 जण कर्तव्यावर होते. त्यापैकी अनेक जण वयोवृद्ध झाल्याने त्यांच्याकडून फारसे काम होत नाही. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अशा हमालांना गँगमनचा दर्जा देत रेल्वेत सामावून घेतले. त्यानंतर सध्याच्या रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे सहायक असे गोंडस नाव हमालांना दिले. मात्र, प्रत्यक्षात पदरी उपेक्षाच पडल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हमालांना मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT