मुंबई

पाकिस्तानातून करोडोंच्या टोळधाडी मुंबईत, मुंबईकरांमध्ये दहशत ! खरं काय जाणून घ्या..

सकाळवृत्तसेवा

मुंबई  - मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गालागत टोळधाड आल्याचे व्हिडीओ आणि फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले. मुबईसह ठाण्यातही आज टोळधाडीच्या अफवेने खळबळ माजली. होय, ती अफवाच होती. टोळधाडीने खडबडून जाग्या झालेल्या पालिकेच्या यंत्रणेने व्हिडीओ आणि फोटो फेक असल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांच्या जीवात जीव आला. 

ठाण्यापासून मुंबईपर्यंत या टोळधाडीच्या व्हिडीओ आणि फोटोनी धुमाकूळ घातला. बातमी वाऱ्यासारखी दोन्ही शहरात पसरली. पूर्व द्रुतगती महामार्गालगत राहणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांनी आज दारे खिडक्या बंद केल्या होत्या. 

टोळधाडीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताच पूर्व उपनगरातील पालिकेच्या चार सहाय्यक आयुक्तांनी तातडीने सूत्रे हलवून टोळधाडीची खातरजमा केली. मात्र अशी टोळधाड पूर्व उपनगराच्या कोणत्याही भागात नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले. अखेर व्हायरल झालेले हे व्हिडीओ आणि फोटो फेक असल्याचे स्पष्ट झाले.

याबात मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजन नारिंगरेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, व्हायरल झालेले व्हिडिओ आणि फोटो फेक आहेत. त्यामधील लोकेशन मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गालगतचे नाही. पालिकेच्या यंत्रणांनी त्याबाबत शहानिशा केली. मात्र अशी टोळधाड मुंबईत आलेली नाही. राज्याच्या ग्रामीण भागात टोळधाडीने पिकांचे नुकसान झाले आहे. टोळधाड मुंबईत आल्यास काय खाणार असा सवाल नारिंगरेकर यांनी केला. 

विक्रोळी येथे पुर्व द्रुतगती मार्गावर टोळधाड पोहचल्याचा मेसेज दुपारी WhatsApp वर व्हायरल झाला. थोड्याच वेळात या मेसेजमुळे विक्रोळी परीसरात प्रचंड दहशत पसरली. अनेकांनी तत्काळ घराच्या दारं अंडी खिडक्या बंद करुन घेतल्या. विक्रोळी बरोबर घाटकोपर भांडूप भागातही अशीच परीस्थीती होती. तर विक्रोळीत आलेली टोळ धाड ठाण्याच्या दिशेने येत आहे. असाही मेसेज ठाण्यात पसरला होता. 

अफवा पसरवून नागरीकांमध्ये घबराट पसरविणे कायद्याने गुन्हा आहे.अशा प्रकारचे खोटे मेसेज पसरावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराा पालिकेने दिलाआहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT