shrinivas vanga
shrinivas vanga 
मुंबई

श्रीनिवास वनगा यांचा मार्ग युतीमुळे मोकळा

सकाळवृत्तसेवा
विरार - शिवसेना-भाजप युतीची अखेर सोमवारी (ता. 18) घोषणा झाली आणि पालघरची जागा भाजपने सोडल्याने शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे; भाजपमध्ये या निर्णयामुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

युती होणार की नाही, यावर काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. अखेर दोन्ही पक्षांचे सूर जुळले. दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असले, तरी पालघरच्या जागेवरून मात्र भाजप कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया देतानाच पालघर हा भाजपचा गड असल्याने तो शिवसेनेला देण्यास कार्यकर्त्यांचा विरोध कायम आहे. पूर्वी उत्तर-मुंबई मतदारसंघ पालघरपर्यंत असताना राम नाईक निवडून येत होते, तर डहाणूतून चिंतामण वनगा निवडून येत होते. त्यानंतर नायगावच्या पुढे थेट गुजरातच्या सीमेपर्यंत पालघर मतदारसंघाची निर्मिती झाली. भाजपने या मतदारसंघात चांगली पक्षबांधणी केली आहे. त्यामुळे तो शिवसेनेला देण्यास येथील कार्यकर्त्यांचा विरोध आहे. परंतु, युतीची घोषणा झाल्याने नाराज कार्यकर्ते कोणता निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पालघरची जागा मिळाल्याने शिवसेनेमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. या मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलेले चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना शिवसेना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार आहे. त्यांचा विजय हीच चिंतामण वनगा यांना आदरांजली असेल, असे शिवसेनेचे कार्यकर्ते सांगत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT