मुंबई

चक्रीवादळने मुंबईला बायपास केले परंतु; महावितरणाची बत्ती मात्र गुलच राहिली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घोंघावणारे चक्रीवादळ मुंबईला धडकले नाही, पण मुंबईच्या उपनगरात कित्येक तास वीजपुरवठा खंडीत राहिला. मुंलुंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबई, कल्याण - डोंबिवली, वसई - विरारमध्ये बुधवारी रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

चक्रीवादळ येत असल्यामुळे साठ सब स्टेशनवरील पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्याचबरोबर जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी इलेक्ट्रीक पोल पडले तसेच झाड्यांच्या फांद्या वायरींवर पडल्या तसेच अनेक डीपीमध्येही बिघाड झाला होता. मुंबई शहरातील विद्युत पुरवठा प्रामुख्याने सुरळीत होता. विशेषतः रुग्णालयातील विजपुरवठा खंडीत होणार नाही याकडे बेस्टने विशेष लक्ष दिले होते. 

मुंबईच्या उपनगरात मात्र ही परिस्थिती नव्हती. दुपारपासून खंडीत झालेला वीज पुरवठा किमान सहा तास बंद होता. त्यामुळे वाय-फायही बंद झाले, परिणामी अनेकांच्या कामावर परिणाम झाला. कोरोनामुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करीत आहेत. कार्यालयीन कामात अडथळा येत असल्याने अनेकांनी महावितरणच्या हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधला, पण फारसा उपयोग होत नसल्याचे अनेकांनी सांगितले. 

ट्रान्सफॉर्मर, फीडरचे जोरदार वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. त्याची तपासणी करुन काम सुरु आहे. त्यास अर्थातच वेळ लागतो. पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरु करण्याचाही या कालावधीत प्रयत्न झाला. जोरदार वारे वहात असल्याने तसेच पाऊस असल्याने कामात व्यत्ययही येत होता, असे आधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Video: फडणवीसांच्या नात्यातील महिला जरांगेंकडे! धनंजय मुंडेंनी त्रास दिल्याचा आरोप

ऑस्ट्रेलियाचा गेम झाला, शेवटच्या सामन्याआधीच T20 World Cup मधून बाहेर; Super-8 मधील ७ संघ ठरले, आता एका जागेसाठी कोण शर्यतीत?

Latest Marathi News Live Update : भाईंदरात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार, मनसेचा आक्रमक पवित्र्याने आरोपीला अटक

पडद्यावर रोमॅंटिक हिरो पण खऱ्या आयुष्यात पत्नीला अशी वागणूक द्यायचा मिथुन चक्रवर्ती; इतक्या सुंदर बायकोला त्याने...

Yeola News : येवल्यात घरकुलांचा निधी पडून! ५ हजार लाभार्थ्यांनी अजून पायाही खोदला नाही; प्रशासनाकडून नोटिसा

SCROLL FOR NEXT