मिरा रोड : मिरा-भाईंदर शहरातील खालगी कोव्हिड 19 रुग्णालयांकडून रुग्णांची अवाजवी लूट सुरू असल्याचा आरोप होताच, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका मोबाईल अॅप तयार करणार आहे. या अॅपमुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानी वसूलीवर लक्ष ठेवण्याबरोबर रुग्णालयातील सुविधांची अचूक माहिती नागरिकांना मिळणार आहे.
राज्य सरकारने प्रत्येक कोव्हिड 19 खासगी रुग्णालयात स्थानिक कोरोना रुग्णाला त्वरीत बेड मिळावा. त्याच्यावर माफक दराने उपचार व्हावेत, यासाठी एकूण बेडपैकी 80 टक्के बेड स्थानिक प्रशासनाच्या नियंत्रणाखाली आणले आहेत. तसेच रुग्णांच्या उपचारासाठी दरही निश्चित केले आहेत. उर्वरीत 20 टक्के बेड त्या रुग्णालयाने स्वत:च्या कोट्यात ठेवून त्यातील दर रुग्णालयांना निश्चित करण्याची मुभा देण्यात आली आहे, मात्र या सरकारी आदेशाचे सर्रास उल्लंघन करुन त्यात पळवाटा शोधून अद्यापही काही खासगी रुग्णालयांकडून मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी येताच पालिकेने मोबाईल अॅप तयार करण्याचे ठरवले आहे. यामुळे शहरातील सर्व नागरिकांना खासगी तसेच सरकारी कोव्हिड 19 रुग्णालयांतील एकूण बेडची संख्या, त्यातील 80 आणि 20 टक्के बेडची उपलब्धता, राज्य सरकारने निश्चित केलेले दर आदींची माहिती मिळणार आहे.
नवीन मोबाईल अॅप दोन दिवसांत कार्यान्वित केले जाणार असून त्याद्वारे शहरातील प्रत्येक खासगी कोव्हिड 19 रुग्णालयांतील सुविधांची माहिती मिळणार आहे. तसेच खासगी रुग्णालय बेकायदेशीर कारभार करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असून प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- चंद्रकांत डांगे, आयुक्त, महापालिका
a look at private hospitals through a mobile app, an important decision by mira bhayindar municipality
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.