मुंबई

थंडीचा जोर वाढण्याची शक्यता, मुंबईत यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 7 : मुंबईतील सांताक्रुज येथे किमान तापमान 17.8 अंश सेल्शियस इतके नोंदवण्यात आले असून हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वात कमी तापमान असल्याची नोंद मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने केली आहे. त्यामुळे मुंबईत पहाटे धुक्यासह थंडीचे जोर वाढल्याचे दिसते. तर दिवसा कमाल तापमान 35 अंश सेल्शियस असं नोंदवण्यात आले आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी मुंबईचे किमान तापमान 17 अंशाच्या आसपास नोंदवले गेले. राज्यात सर्वात कमी तापमान परभणी येथे 10.2 अंश सेल्शियस आहे. पुढील 24 तासांत राज्यातील किमान तापमानात घट होणार असून मराठवाडा आणि विंदर्भात देखील किंमान तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. पुणे, परभणी आणि नाशिक येथील किमान तापमानातही आणखी घट होईल. राज्यात हळूहळू थंडीची चाहूल सुरू झाली असून सकाळी थंड तर दिवसा गरम असे वातावरण बघायला मिळत आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्शियस )

मुंबई - 17.8, पुणे - 10.7, परभणी 10.2, नाशिक 10.5, औरंगाबाद 12.4, डहाणू 18.7, सातारा 12.2, बारामती 11.6, बीड 12.8, यवतमाळ 12.0, नागपूर 13.2 

राज्यातील बऱ्याच ठिकाणी तापमान 12 अंशांच्या खाली नोंदवण्यात आले आहे. पुढील काही दिवसात किमान तापमानात घट होणार असून थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

lowest temperature of the season recorded in mumbai mercury expected to fall in coming days 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT