madhukar ghusale 
मुंबई

'सोनियाची उगवली सकाळ' या प्रसिद्ध गाण्याचे गीतकार मधुकर घुसळे यांचे निधन

रविंद्र खरात

कल्याण : 'सोनियाची उगवली सकाळ' या प्रसिद्ध गाण्याचे गीतकार मधुकर घुसळे यांचे रविवारी (ता. 9) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. रात्री उशिरा कल्याण पूर्वमधील विठ्ठलवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मागील 50 वर्षांपासून कवी मधुकर घुसळे कल्याण पूर्वमधील वालधुनी दत्त मंदिर, शिवाजी महाराज नगर परिसरात आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. "सोनियाची उगवली सकाळ' यासारख्या अजरामर गाण्याने त्यांना नाव दिले असले, तरी त्यांनी, "आता काय लाजायचं', "डोकं फिरलंया, हाताला धरलंया', "भीमरावांचा पाळणा', "माणुसकीला कलंक लावी रीत हुंड्याची काळी' आदी अनेक ओठावर गुणगुणणारी गाणी तसेच कोळीगीते, लोकगीते दिली आहेत.

प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, रंजना शिंदे यांसारख्या नामवंत गायकांनी त्यांची गाणी गायली आहेत. एक हरहुन्नरी लोककवी, भीमकवीच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

Lyricist Madhukar Ghusle passes away read detail story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! गणेशोत्सवानिमित्त रात्री 'या' वेळेपर्यंत चालणार मेट्रो; कसं आहे नियोजन?

Latest Marathi News Updates : कारंजात जोरदार पर्जन्यवृष्टी, शहरातील रस्ते जलमय

बाबो! ठरलं तर मग मालिकेतील अर्जुनने दिली गुड न्यूज, पत्नी श्रद्धा म्हणाली...'बाप्पाने वर्षाभरात इच्छा पूर्ण केली.'

Jalgaon Ganeshotsav 2025 : जळगावात गणेशोत्सवासाठी पोलिस दल सज्ज; 'डीजे'ला मिरवणुकीतून 'आउट'

Duleep Trophy 2025: विदर्भाचा दानिश द्विशतकाच्या उंबरठ्यावर, तर RCB कर्णधार रजत पाटिदारचं २४ बाऊंड्रींसह आक्रमक शतक

SCROLL FOR NEXT