मुंबई

नव्या वर्षात रेल्वे प्रवाशांना एम. इंडिकेटर अँपवर मिळणार मराठीत माहिती

कुलदीप घायवट

मुंबई:  मुंबई आणि पुणे उपनगरीय रेल्वे संदर्भातील माहिती देण्यासाठी एम. इंडिकेटर अँपचा मोठ्या प्रमाणात वापर केला  जातो. या अँपमध्ये मिळणारी माहिती उत्तम असल्याने प्रत्येक रेल्वे प्रवाशांच्या मोबाईलमध्ये हे अँप असते.  त्यामुळे अँपची लोकप्रियता अफाट झाली आहे. मात्र या अँपवर मराठी भाषा नसल्याने अनेकांना अँपमधील संपूर्ण माहिती मिळत नव्हती. त्यामुळे या अँपमध्ये मराठी भाषा सुरु करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात एम. इंडिकेटर अँपवर इंग्रजीसह मराठी भाषा येणार आहे.

एम. इंडिकेटर अँपवर लोकल, बेस्ट, एक्सप्रेस, एसटी, मोनो, मेट्रो, रिक्षा कॅब, फेरी, मुंबई स्थानक नकाशा यांची माहिती देतो. यासह रेल्वेची माहिती, मेगाब्लॉकची माहिती, तसेच इतर पर्यायी वाहतुकीची माहिती मिळते. मात्र हि माहिती फक्त इंग्रजीमध्ये असल्याने अनेक प्रवाशांना हे अँप वापरणे अडचणीचे ठरत होते. 

त्यामुळे सर्व प्रवाशांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी हे अँप मराठी करण्यात येत आहे. 
एम. इंडिकेटर अँपवर सर्व मराठी भाषिक प्रवाशांना रेल्वे आणि इतर पर्यायी वाहनांची माहिती मराठीतून मिळण्याची मागणी मराठीप्रेमी करत होते. एम. इंडिकेटर अँपच्या समाज माध्यमावर मराठीप्रेमी ही मागणी करत होते. यासह अनेकांनी मेलद्वारे एम. इंडिकेटरला संदेश पाठविले होते. तसेच अँपवर मराठी भाषा आणण्यासाठी एम. इंडिकेटरचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे नव्या वर्षात मराठीमय एम. इंडिकेटर अँप दिसेल. 

एम. इंडिकेटर अँपवर मराठी भाषा आणण्याचे नियोजन सुरु होते. आता ते प्रत्यक्षात येणार आहे. प्रवाशांना नव्या वर्षात 1 जानेवारी 2021 ला मराठीत एम. इंडिकेटर अँप वापरता येणार आहे. मराठी प्रवाशांना सर्व माहिती मराठी भाषेत मिळण्यासाठी  अँपमध्ये मराठी भाषा सुरु करण्यात येणार आहे. 
सचिन टेके, निर्माता, एम. इंडिकेटर अँप

एम इंडिकेटर अँप मराठमोळ्या सचिन टेके यांचे आहे. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. त्यांचे एम. इंडिकेटर हे अँप मराठी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यांनी नव्या वर्षात सकारत्मक बदल करावा. 
गोवर्धन देशमुख, अध्यक्ष, मराठी एकीकरण समिती

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

M indicator local train application marathi upcoming new year sachin teke

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अयोध्या हादरली! मेडिकल कॉलेजच्या 'एक्स-रे रूम'मध्ये सापडला बॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला; तीन जण ताब्यात

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! आता दररोज मुंबईहून कोकणात रेल्वे धावणार, प्रशासनाची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

Crime News: लपंडाव खेळताना पाशवी कृत्य! शेतात नेलं अन्...; ९ वर्षांच्या मुलीवर ५ जणांचा अत्याचार

August 2026 Calendar: स्वातंत्र्य दिन, गटारी अमावस्या, नागपंचमी ते रक्षाबंधन; जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ प्राधिकरणाची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT