Terrorist attack  sakal media
मुंबई

दहशतवाद्यांवरील कारवाईनंतर पोलीस सतर्क; रेल्वेस्थानकांची सुरक्षा वाढवली

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) केलेल्या कारवाईत मुंबईतील (mumbai) जोगेश्वरी विभागातून झाकीर नावाच्या संशयित दहशतवाद्याला (terrorist) ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत (delhi) अटक करण्यात आलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांशी झाकीरचा संबंध असल्याची माहिती समोर आल्याने नवी मुंबई पोलिसही (Navi Mumbai police) सतर्क झाले आहेत.

त्यापार्श्वभूमीवर आज रेल्वे पोलिस, तसेच रेल्वे सुरक्षा दलाने एकत्र पाहणी करत पनवेल तसेच नवी मुबंई परिसरातील रेल्वेस्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. दहशतवादी सणासुदीदरम्यान रेल्वेस्थानकांना टार्गेट करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकार, तसेच राज्य सरकारकडूनही खबरदारीच्या सूचना स्थानिक प्रशासनांना देण्यात आल्या आहेत. त्यात रविवारी (ता. १९) गणेश विसर्जन असल्याने नवी मंबई ​पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करत तपासणी सुरू केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पनवेल, तसेच नवी मुंबई रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांच्यावतीने देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin’s Favourite Food: चहा, मासे अन्.... व्लादिमीर पुतिन यांना खायला काय आवडतं? वाचा संपूर्ण यादी

Marathi Breaking News LIVE: शिरूरमध्ये शेतात बिबट्या मृत अवस्थेत सापडला

IND vs SA 3rd ODI: विराट कोहलीमुळे उडाला गोंधळ; Vizag मध्ये नेमकं काय घडलं? पोलिसांची दमछाक अन्...

Vladimir Putin Interview : रशियाने खरंच मोदींच्या हत्येचा कट उधळला? 'त्यादिवशी' कारमध्ये काय चर्चा झाली? पडद्यामागची गोष्ट समोर...

लक्ष्याने आम्हाला पोसलंय... विजय पाटकरांनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डे यांची 'ती' आठवण; म्हणाले-त्याच्यासारखा माणूस...

SCROLL FOR NEXT