maharashtra bjp leaders to meet governor after meeting at varsha bungalow
maharashtra bjp leaders to meet governor after meeting at varsha bungalow 
मुंबई

वर्षा बंगल्यावरील बैठकीनंतरच, भाजप नेते राज्यपालांना भेटणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात सध्या सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. भाजप-शिवसेना यांच्यात तडजोड होऊन, महायुतीचेच सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत 105 जागांसह सर्वांत मोठा पक्ष असलेला भाजप राज्यपालांपुढे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. 

भाजपची भूमिका काय?
सध्या भाजप नेते राज्यपालांना भेटण्याच्या तयारीत आहेत. यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद सोडायचे का? खातेवाटप कसे होणार? या विषयी भाजप नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. भाजपने गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्रिपदसोडून इतर खाती शिवसेनेला देण्याची भूमिका जाहीर केली होती. पण, शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेनेला आमदार फुटीची भीती
दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांची आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. त्यात उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मुंबई न सोडण्याचे आदेश दिले आहेत. भाजपकडून, शिवसेनेचे आमदार फोडण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईत शिवसेना आमदारांना हॉटेलवर एकत्र ठेवण्यात येणार आहे. 'शांत रहा, एकत्र रहा,' असा संदेश उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिल्याचे सांगितले जाते.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT