Maharashtra BJP Meeting 
मुंबई

Maharashtra BJP Meeting: "मेहबूबा मुफ्तींसोबत सत्तेत जावं लागलं कारण..." फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

Sandip Kapde

Maharashtra BJP Meeting:  भाजपने २०२४ निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. आज भाजपची 'महाविजय अभियान २०२४', ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत राज्यभरातील महत्त्वाचे नेते आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांना संबोधित केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेर भाजप शिवसेना, आता राष्ट्रवादीच थोडासा झेंडा लावण्याची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे.

फडणवीस म्हणाले, नेहमी विचार दूरचा करयाचा असतो, त्यासाठी संयम आणि विश्वास आवश्यक आहे. पक्ष आणि नेृत्तवावर विश्वास असल्याने भाजप उभी राहीली. आता आपल्याला विष पचवायचं नाही आहे. पण महाविजयासाठी कडू औषध जरी घ्यायची गरज पडली तर घ्यावं लागेल.

अनेकवेळा उपहास अन्याय पचवला आहे. लोकसभेत २ सदस्य निवडून आल्याने भाजपला चिडवलं होतं. आता भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत. सरकारमध्ये आपल्याला आता नवीन सहकारी मिळाला आहे.  

कधीकाळी देशासाठी आपल्याला महेबूबा मुफ्ती यांच्यासोबत देखील जावं लागले. काही लोकांनी टीका केली. पण ती आवश्यकता होती. ३७० कलम हटवणे आपले ध्येय होते. त्यानंतर त्या पक्षाला लाथ मारून बाहेर येण्याचं काम भाजपने केले. आता पाकव्यात काश्मिर भारतात आणायचे आहे त्यासाठी आपण काम करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT