anil.jpg 
मुंबई

गृहमंत्रीपदावरुन अनिल देशमुखांना हटवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे आग्रही

दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक सदस्यीय समिती स्थापन केली असली, तरी गृहमंत्रीपदावरुन देशमुखांना बदलण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत. गृहमंत्री देशमुखांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गृहखाते काढून घेऊन, दुसऱ्या खात्यात त्यांची बदली करावी, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका असल्याचे शिवसेनेतील अंतर्गत सूत्रांनी सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. 

हे लगेच शक्य नसेल, तर मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्यात येतील, त्यावेळी हा खाते बदल करावा, असे ठाकरेंना वाटत असल्याचे सेनेतील वरिष्ठ नेत्याने सांगितले. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात अजून या संदर्भात चर्चा व्हायची बाकी आहे, असे सेना नेत्याने सांगितले. अनिल देशमुखांनी गृहखाते ज्या पद्धतीने हाताळले, त्यावर उद्धव ठाकरे नाराज आहेत. याआधी झालेल्या एका बैठकीत उद्धव ठाकरेंनी आपलं याबद्दलच मत  शरद पवारांना सांगितलं होतं, असं सेना नेत्याने सांगितलं.  

"मंत्रिमंडळात काही फेरबदल होऊ शकतात. सचिन वाझे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले गेले, त्यावर मुख्यमंत्री नाराज आहेत. गृहमंत्र्यांची आपल्या खात्यावर पकड नाहीय, असे मुख्यमंत्र्यांना वाटते. गृहमंत्र्यांपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडे किती जास्त माहिती असते, ते आपण पाहिले आहे" असे शिवसेनेच्या नेत्याने सांगितले. येत्या काही दिवसात ठाकरे आणि पवार या मुद्यावर चर्चा करतील. 

"सचिन वाझे प्रकरणामुळेच मुख्यमंत्री ठाकरे देशमुखांवर नाराज नाहीयत, तर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले ते ही मुख्यमंत्र्यांना पटले नव्हते" असे शिवसेना नेत्याने सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल हे गृहमंत्री देशमुखांवरील आरोपांची चौकशी करणार आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुखांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटीच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. परमबीर सिंह यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल केली. त्यावर आज कोर्टाचा आदेश येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT