मुंबई

मोठी बातमी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल...

सकाळवृत्तसेवा

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल केला. फॉर्म भरताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाची असलेली ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. काँग्रेसनं जाहीर केलेल्या सहाव्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला होता. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला होता. काँग्रेसच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसनं एक उमेदवारी मागे घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला दिला होता निरोप

या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं जालना जिल्ह्यातल्या राजेश राठोड तर अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर ऊर्फ पापा मोदी अशा दोघांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर जर काँग्रेस आडमुठेपणा सोडणार नसेल तर मी विधान परिषद निवडणुक लढवणार नाही, असा निरोप उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांना दिला होता. पहिल्यापासून विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध लढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक होते.

अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख 

आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येत्या 14 मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तर 21 मे रोजी मतदानाची तारीख आहे. 

या जागांसाठी असणार निवडणूक 

विधानपरिषदेचे 8 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झालेत. त्यापैकी एक जागा 24 एप्रिलच्या आधीपासून रिक्त आहे. यात राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झालेत. तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होईल. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 5 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून येतील असा दावा केला जात होता. पण आता काँग्रेसने सहाव्या जागेवरही दावा केला आहे. त्यानुसार आता शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसही 2 जागा लढतील.

21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं घोषणा केली. तसंच केंद्रीय निवडणूक आयोगानं तारीख आणि पूर्ण कार्यक्रमही जाहीर केला. मुंबईत ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मतं हवीत. निवडणुकीच्याच दिवशी मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी 26 मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिलेत. पण आता विधान परिषदेच्या 9 जागांसाठी महाविकास आघाडीचे 5 आणि भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार रिंगणात असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग सर्व उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित करु शकते. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सेनेनं उद्धव ठाकरेंसह निलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार आहेत?

  • उद्धव ठाकरे- शिवसेना
  • निलम गोऱ्हे- शिवसेना
  • शशिकांत शिंदे- राष्ट्रवादी काँग्रेस
  • अमोल मिटकरी- राष्ट्रवादी काँग्रेस
  • राजेश राठोड- काँग्रेस
  • रणजितसिंह मोहिते पाटील- भाजप
  • गोपीचंद पडळकर- भाजप
  • प्रवीण दटके- भाजप
  • डॉ. अजित गोपछेडे- भाजप

maharashtra cm uddhav thackeray to fill his MLC election form today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: मोठ्या घसरणीसह आठवड्याचा शेवट, सेंसेक्स 694 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वाढले?

जेव्हा पती-पत्नीमध्ये भांडणं होतात... सीमासोबतच्या घटस्फोटाबद्दल अखेर बोलला सोहेल खान; म्हणाला- गेली २४ वर्ष मी...

अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचं भविष्य सांगितलं, पण पुण्याच्या ट्रॅफिकवर उत्तर नाही? 43व्या ज्योतिष अधिवेशनात धक्कादायक खुलासे

Maharashtra Latest News Live Update : विधिमंडळ सार्वजनिक उत्सव समितीने दौंड एसआरपीएफ येथे भेट दिली

B. Sudershan Reddy: उपराष्ट्रपतिपदासाठी इंडिया’ आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT