मुंबई

वाडिया प्रश्नावर सरकारकडून ४४ कोटींचं फर्स्ट एड

सकाळ वृत्तसंथा

मुंबई -  मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरु राहण्याच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेऊन मध्यस्थी केली त्यामुळे हे रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे.

वाडिया रुग्णालयाला राज्य शासनाकडून 44 करोड रुपये अदा केले जाणार आहेत. तर बृहन्मुंबई महापालिकेला 22 कोटी रुपये तात्काळ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कुठल्याही परिस्थित वाडिया रुग्णालय बंद होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर वाडिया रुग्णालय सुरु राहण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. याचसोबत इतर प्रश्नांसंदर्भात देखील तातडीची बैठक येत्या १० दिवसात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतखाली घेतली जाणार असल्याची देखील माहिती समोर येतेय. 

लालबाग परळमधील तसंच मुंबईतील गोरगरीबांना आरोग्याच्या सुविधा स्वस्तात देणारे वाडिया रुग्णालय बंद  होऊ नये अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरवातीपासूनच घेतली होती. आज नस्ली वाडिया हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी आयोजित बैठकीस उपस्थित होते. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार,  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी व इतर अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची देखील या बैठकीस उपस्थिती होते. 

महापालिका आणि राज्य शासन हे आवश्यक तो निधी वाडिया रुग्णालयास उपलब्ध करून देणार असून इतर मुद्द्यांवर येत्या १० दिवसांत निर्णय घेऊन हे रुग्णालय सुरळीतपणे सुरु राहील तसेच यातील कामगार-कर्मचारी यांच्या नोकऱ्या देखील अबाधित राहतील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

maharashtra cm uddhav thackeray took decision of alloting 44 crore to wadia hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

SCROLL FOR NEXT