vaccine.jpg 
मुंबई

कोरोनाशी युद्ध! महाराष्ट्राला दर आठवड्याला लागणार ३५ लाख लसींचे डोस

दीनानाथ परब

कालपासून देशात ४५ वर्षावरील वयोगटासाठी लसीकरणाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र सरकारने  केंद्र सरकारकडे दर आठवड्याला ३५ लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. बुधवारी महाराष्ट्राला २६.८ लाख कोविशिल्ड लसींचे डोस मिळाले. हे सर्व डोस सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये पाठवून देण्यता आले, असे राज्य सरकारचे अधिकारी डॉक्टर डी.एन.पाटील यांनी सांगितले. डाटानुसार, सध्या राज्याकडे ८.३ लाख लसींचे डोस शिल्लक आहेत. हे सर्व डोस आणि नवीन मिळालेले २६.८ लाख लशींच्या डोसचे राज्यातील जिल्ह्यांमध्ये वितरण सुरु आहे. 

कोविशिल्ड लसींची उपलब्धता वाढली असून कोव्हॅक्सिनचे वितरण मर्यादीत स्वरुपात सुरु आहे. ४५ पुढील वयोगटाच्या लसीकरणाला परवानगी दिल्यामुळे राज्याचे आता ४.५ कोटी लोकांच्या लसीकरणांचे लक्ष्य आहे.  

याआधी १.८ कोटी नागरिकांच्या लसीकरणांचे लक्ष्य होते. या नव्या लक्ष्यामुळे दररोजच्या लसीकरणांची संख्या वाढणार असून, लसीची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या दिवसाला २.७ लाख नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. नव्या वयोगटामुळे लसीकरणाचा हाच आकडा पाच लाखाच्या घरात जाईल असे अधिकाऱ्याने सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Fuel System: अमेरिकेतील पेट्रोल पंपांवरील इंधन प्रणाली हॅक! ATG सिस्टम ठरले धोकादायक; तपास यंत्रणांचा कुणावर संशय?

IPL चालू असतानाच हार्दिक पांड्या माहिकाची करणार लग्न? चर्चेला उधाण, पण नेमकं सत्य काय?

Taj Mahal Scam: ताजमहाल पाहण्याचा प्लॅन आहे? बनावट तिकीट वेबसाईटमुळे हजारो रुपये गमावू शकता; सरकारची अ‍ॅडव्हायझरी जारी

Chaat Capital: भारताची 'चाट राजधानी' कोणती ठावूक आहे? गल्लोगल्ल्यांमधील तो चटपटीत स्वाद; जाणून घ्या का आहे इथली चाट जगप्रसिद्ध!

Medical Bandh: २० मे रोजी देशभरात मेडिकल सेवा बंद! कारण काय, केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या मागण्या नेमक्या काय?

SCROLL FOR NEXT