Raj and Uddhav thackeray 
मुंबई

'प्रवासासाठी शिवपंख लावून द्या, लोक कामाला उडत येतील', मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

'लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे या...'

दीनानाथ परब

मुंबई: कोविड निर्बंधांबाबत (covid restriction) सोमवारी राज्य सरकारने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्या आधारे मुंबई महापालिकेने (BMC) दिलासा देत दुकाने, (shops) आस्थापने आता रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील संसर्गदर कमी असलेल्या २२ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला असून आता दुकाने, मॉल, (Mall) जिम, स्पा, केशकर्तनालये सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उपरोधिकपणे कौतुक केलय. काल आमचे मुख्यमंत्री जगात भारी, म्हणत देशपांडेंनी उपरोधात्मक टीका केली होती. "आस्थापना उघडली, आता जनतेला प्रवासासाठी शिवपंख लावून द्या, लोक कामाला उडत उडत येतील" असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

"सी.एम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही.मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी" असे संदीप देशपांडे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

कालच्या टि्वटमध्ये काय म्हटलं होतं?

"पाहिले एकच म्हण होती "तळे राखी तो पाणी चाखी" या सरकारच्या काळात अनेक नव्या म्हणींचा जन्म झालाय" असे संदीप देशपांडे यांनी सोमवारच्या टि्वटमध्ये म्हटले होते. "मराठी भाषेला नवीन म्हणी बहाल केल्याबद्दल मुख्यमंत्रांचे जाहीर आभार" असे उपरोधिक शब्दात म्हटले आहे.

"पाहिले एकच म्हण होती" तळे राखी तो पाणी चाखी"या सरकारच्या काळात अनेक नव्या म्हणींचा जन्म झालाय"शहर राखी तो बिर्याणी चाखी" "महापालिका राखी तो कमिशन चाखी" सरकार राखी तो वसुली चाखी"मराठी भाषेला नवीन म्हणी बहाल केल्याबद्दल मुख्यमंत्रांचे जाहीर आभार. आमचा सी.एम जगात भारी" अशी उपरोधिक टीका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT