मुंबई

"मित्र त्यांना जाऊन मिळाला म्हणून हे चित्र", चंद्रकांत पाटील

सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या आणि पदवीधर मतदार संघाचे निकाल जाहीर झालेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने या निकालांमध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. नागपूर आणि पुणे पदवीदार मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय. पहिल्यांदाच नागपूर आणि पुणे मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या रूपानं महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. या निकालानंतर  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. मुंबईत चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते. 

"मित्र त्यांना जाऊन मिळाला म्हणून हे चित्र"

याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेत की, भाजपाला निवडून द्यायचं नाही हा एकाच महाविकास अजेंडा होता. मी महाविकास आघाडीला चॅलेंज देतो, हिंमत असेल तर एकटे एकटे लढा. आमच्या उमेदवारांचा जो पराभव झाला आहे त्याच आम्ही नक्की चिंतन चिंतन करू. प्रत्येक पक्षाची वोट बॅक असल्यामुळे आमचा पराभव झाला. मित्र त्यांना जाऊन मिळाला म्हणून हे चित्र (शिवसेना ) पाहायला मिळालं. शिवसेनेला या निवडणुकीत अक्षरशः भोपळा मिळाला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे असूनही शिवसेनेला उमेदवार निवडता येत नाही. मी विनोदी विधान करतो अस शरद पवार बोलतात, त्यांना बोलू द्या. शिवसेना सोबत असती तर बळ मिळालच असतं. पण ते सोबत नाही, त्यांनी आता रंग बदलला आहे. ते सध्या राष्ट्रवादीसोबत आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. 

maharashtra vidhan parishad padvidhar election results official reaction of chandrakant patil of BJP

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fraud: १३.१७ कोटी रुपयांची फसणूक, मुंबईत २१ वर्षीय एका तरुणाला अटक, काय आहे प्रकरण?

Baramati Vidhansabha Byelection : बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न; दिल्ली दरबारी होणार काँग्रेसचा निर्णय

Dowry Harassment Case : भाजीत केस सापडल्याने निर्दयी मारहाण, छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; 5 तोळं सोनं, 2 लाख हुंडा देऊनही पतीचं नाही झालं समाधान

Kapil Dev: फक्त IPL नव्हे, देशासाठी खेळण्याचं स्वप्न बाळगा; कपिल देवांनी तरुणांना दिला मोठा मंत्र म्हणाले...

Latest Marathi News Live Update : सिल्लोड आगारातील कर्मचाऱ्याची आत्महत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT