मुंबई

महाराष्ट्रात बलात्कारासह हत्येचे सर्वाधिक गुन्हे; महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांत राज्य तिसऱ्या क्रमांकावर

अनिश पाटील


मुंबई - 2019 मध्ये  देशात बलात्कारासह हत्येचे सर्वाधिक गुन्हे म्हणजे 47 महाराष्ट्रात घडले आहेत. राज्यापाठोपाठ मध्य प्रदेशात(37) बलात्कारासह हत्येचा गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशात 34 बलात्कारासह हत्येचा गुन्हा दाखल झाले होते.

महाराष्ट्रात  महिलांविरोधात 37 हजार 144 गुन्हे घडले. त्याबाबत राज्य देशात तिस-या क्रमांकावर आहे. महिलांविरोधात सर्वाधिक गुन्हे उत्तरप्रदेशात(59853) व राजस्थान(41550) घडले आहेत. गंभीर बाब म्हणजे बलात्काराच्या घटनांचा विचार केला, तर राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थानात सर्वाधीक म्हणजे 5997 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश(3065) व मध्यप्रदेशात(2485) सर्वाधीत बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते. महाराष्ट्र बलात्कााराच्या गुन्ह्यांबाबत देशात चौथ्या क्रमांकावर आहेत. राज्यात 2299 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते. राज्यापाठोपाठ केरळमध्ये 2023 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.

मुंबई ज्येष्ठ नागरीकांविरोधात घडले सर्वाधिक गुन्हे 

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांविरोधात सर्वाधीक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2017 पासून याबाबत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. 2019 मध्ये ज्येष्ठ नागरीकांविरोधात 1231 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ दिल्ली(1076), अहमदाबाद(794) व चेन्नईचा(552) क्रमांक लागतो. त्यातील बहुतांश गुन्हे मालमत्तेशी संबंधीत आहेत. बहुतांश गुन्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरीकांची फसवणूक अथवा लुट करण्यात आली आहे. राज्यही याबाबत देशात आघाडीवर आहेत.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT