rajesh.jpg 
मुंबई

राजेशे टोपेंनी सांगितला कोरोनाला रोखण्याचा रामबाण उपाय

दीनानाथ परब

मुंबई: "केंद्राच्या सूचना आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचं  काटेकोरपणे महाराष्ट्रात पालन होतं. ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट हे सूत्र महाराष्ट्रात पाळलं जातं" असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. "गर्दी टाळण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करतोय. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी आव्हानात्मक गोष्ट सांगितली. तीन लाख लसीकरण करत होतो, त्यांनी सहा लाख करायला सांगितलं. केंद्राकडून पुरवठा केला जाईल असं सांगितलं होतं. आम्ही साडेचार-पाच लाखापर्यंत पोहोचू आणि लवकरच सहा लाखापर्यंत जाऊ" असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. 

"लस नाही म्हणून लसीकरण केंद्र बंद ठेवावं लागतं. लस नाही म्हणून परत पाठवाव लागतय. आमच्या गतीने लस पुरवठा झाला पाहिजे" असे राजेश टोपे म्हणाले. "कोरोनाला रोखायचं असेल, तर रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे अँटीबॉडी वाढवणं हा रामबाण उपाय आहे" असं टोपे म्हणाले. "४५ वर्षाच्या लोकांना लसीकरण करण्यासाठी गाव पातळीवर टीम तयार केली आहे. 20 ते 40 वर्षाच्या वयोगटातील कोरोना रुग्ण वाढत आहेत. इतर राज्यात उशिरा करा पण महाराष्ट्रात पहिल 20 वर्षावरील नागरिकांना लस द्या, ही मागणी आम्ही केली आहे" असे टोपे म्हणाले. 

"ऑक्सिजन पुरवठ्यावर आम्ही FDA च्या माध्यमाने नियंत्रण ठेवत आहोत. ऑक्सिजन इतर राज्यातून आम्हाला द्यावेत ही मागणी केंद्राला केली आहे. A B C कॅटेगरितील रुग्णावर  रेमडीसीवरचा वापर करू नका. हॉस्पिटलचे बिल वाढण्यासाठी रेमडिसीवरचा वापर करू नये" असे टोपे यांनी सांगितले. 

"मुंबई, पुणे येथे अडचण असली तरी बेड उपलब्ध आहेत. पुण्यात बेड वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुकाने बंद केल्याचा रोष आहे. पण आपल्याला जीव वाचवायचे आहेत. थोडी कळ सोसली तर रुग्ण कमी होतील. आज 14 लाख लस म्हणजे 3 दिवसांचा साठा बाकी आहे. दर आठवड्याला 40 लाख लस पुरवठा केंद्राने करायला हवा. 2 दिवसांत 6 लाख प्रतिदिन लसीकरण होईल" असे राजेश टोपे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : राज्यात पारा घसरला, तापमान ६ अंशावर; पुढील दोन दिवसांत हवामानात होणार मोठा बदल

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

माेठी अपडेट! सातारा जिल्ह्यातील एमडी ड्रग्जच्या छाप्यात ११५ कोटींचा मुद्देमाल जप्त;चौघांना कोठडी, मोठा खुलासा होणार?

Driving License : पुण्यात वाहन परवान्यांचा ‘टॉप गियर’; सुमारे २ लाख परवाने वितरित

Pune Satara Highway : पुणे-सातारा दरम्यान ४० कि.मी.च्या सेवा रस्त्याचे विस्तारीकरण

SCROLL FOR NEXT