Legislative Council 
मुंबई

मंत्री महोदयांना लागली डुलकी अन्.. चक्क विखे पाटलांना जागे करण्याची सभापतींवर आली वेळ

Sandip Kapde

Radhakrishna Vikhe Patil : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आज विधानपरिषदेत चांगलीच झोप लागली होती. विखे पाटील पाटील यांना झोपेतून जागे करण्यासाठी चक्क शिपायाला पाचारण करण्यात आले. विखे पाटील एवढे गाढ झोपले होती की उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आवाज देऊन देखील ते उठले नाहीत.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विखे पाटील यांचे नाव घेवून त्यांना महसूल विभागाचं बिल मांडण्यास सांगितले. पण त्यावेळी विखे पाटील आपल्या आसनावर गाढ झोपेत होते.

नीलम गोऱ्हे यांनी दोन तीनदा विखे पाटील यांना हाक मारून जागे करायचा प्रयत्न केला. तरीही ते न उठल्याने अखेर सभागृहात उपस्थित असलेल्या शिपायाला सांगून मंत्री महोदयांना जागे करायला सांगितले. त्यानंतर मग त्यांनी विधेयक मांडले. ५ वाजून ३१ मिनिटांनी हा प्रसंग घडला. सामने याबाबत वृत्त दिले आहे.

महाराष्ट्र पावसाळी अधिवेशवाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकारने राहिलेले सर्व विधेयक आज मांडले. मात्र विखे पाटील यांची विधेयक मांडण्यापूर्वी चांगली धांदल उडाली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज अंतिम प्रस्ताव मांडला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT