After corona Mucormycosis  File photo
मुंबई

कोरोनाच्या बरोबरीने आता 'म्युकॉर्मीकॉसिस'चा आजाराचा धोका

म्युकॉर्मीकॉसिसमध्ये अंधत्व येऊ शकते, जबडा गमवावा लागू शकतो

दीनानाथ परब

मुंबई: कोरोना व्हायरसच्या (corona virus) बरोबरीने आता म्युकॉर्मीकॉसिस (Mucormycosis)आजाराचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उदहारणार्थ उत्तर महाराष्ट्र, विदर्भात म्युकॉर्मीकॉसिसचा आजार झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय. म्युकॉर्मीकॉसिसच्या आजारामध्ये मृत्यूदर ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. म्युकॉर्मीकॉसिसला सध्या सुरु असलेल्या कोरोना साथीच्या आजाराचाच एक भाग समजले जाते. म्युकॉर्मीकॉसिसवर अँटी फंगल औषधे चालतात. या औषधांची आता कमतरता निर्माण झालीय, त्यावरुन आजाराची तीव्रता लक्षात येते. (Maharashtra Mucormycosis a death sentence once it reaches brain)

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर म्युकॉर्मीकॉसिसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली, त्यामुळे परेलच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये म्युकॉर्मीकॉसिससाठी विशेष दवाखाना सुरु करण्यात आलाय. सध्या ग्लोबलमध्ये म्युकॉर्मीकॉसिस झालेले १८ रुग्ण दाखल आहेत. डोळे, नाक आणि घसा तज्ज्ञ डॉ. मिलिंद नवलखे यांच्या मार्गदर्शनाखाली म्युकॉर्मीकॉसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ३१ रुग्णांना दाखल करण्यात आले, त्यातले २५ रुग्ण शहराबाहेरचे होते.

म्युकॉर्मीकॉसिसच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे, असे डॉ. नवलखे यांनी सांगितले. म्युकॉर्मीकॉसिसमध्ये अंधत्व येण्याची शक्यता असते. उपचार सुरु असलेल्या ग्लोबल रुग्णालयात सहा रुग्णांनी आपला वरचा जबडा गमावला असून एका रुग्णाला डोळ्याच्या बुबुळाला मुकावे लागले. परेलच्याच केईएम रुग्णालयात म्युकॉर्मीकॉसिसच्या २५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

केईएममध्ये उपचार घेणारे बहुतांश रुग्ण दूरच्या जिल्ह्यातून आले असून आजार वाढल्यानंतर ते उपचारांसाठी दाखल झाले आहेत, असे केईएमच्या नाक, डोळ, घसा तज्ज्ञ विभागाच्या डॉ. हेतल मारफातिया यांनी सांगितले. या आजारात नाकापासून इन्फेक्शन सुरु झाल्यानंतर ते वरचा जबडा आणि नंतर मेंदूपर्यंत पोहोचते. म्युकॉर्मीकॉसिस मेंदूपर्यंत पोहोचला, तर मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉ. हेतल यांनी सांगितले.

वर्षाला या आजाराचे फार कमी रुग्ण यायचे. पण सध्या दिवसाला म्युकॉर्मीकॉसिसचे तीन ते चार रुग्ण येत आहेत. म्युकॉर्मीकॉसिसच्या आजारामध्ये ट्रीटमेंट करताना औषधांची कमतरता हेच एक आव्हान नाहीय, तर या आजाराचे उपचारही खूप महागडे असतात. उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचा असतो. औषधांचे रोजचा खर्च ६० ते ८० हजार असतो आणि रुग्णाला तीन आठड्यांपर्यंत ही औषधे घ्यावी लागतात, असे डॉ. झांबाणे यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलेय. कोविडच्या साथी आधी म्युकॉर्मीकॉसिस आजाराचे रुग्ण दुर्मिळ होते. पण कोरोनाची साथ आल्यानंतर या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ व्हायला, तीन गोष्टी कारणीभूत आहेत. कोविड, डायबिटीस आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांवर स्टेरॉईडचा वापर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

Video: जुनं वचन पाळलं! मित्राची सैन्यात निवड होताच खांद्यावर बसवून काढली गावभर मिरवणूक; कोल्हापूरचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT