मुंबई

Maharashtra News: राज्यातील ४२ हजार कंत्राटी वीज कामगार मंगळवारपासून संपवार!

माध्यमातून नुकताच दोन दिवसांचा लाक्षणिक संप केला होता. मात्र, ऊर्जा विभागासह वीज कंपन्यांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra News: महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांत कार्यरत असलेले जवळपास ४२ हजार कंत्राटी वीज कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवार (५ मार्च) पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांच्या कामकाजावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे.

वीज कंपन्यांत रिक्त असलेल्या पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत पद भरती करू नका, १ एप्रिलपासून ३० टक्के वेतनवाढ करा, अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी वीज कामगारांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंत्राटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून नुकताच दोन दिवसांचा लाक्षणिक संप केला होता. मात्र, ऊर्जा विभागासह वीज कंपन्यांनी त्याची फारशी दखल घेतली नाही. त्यामुळे संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिली आहे.

काय आहेत मागण्या?

- तिन्ही वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या

- कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका

- कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात १ एप्रिलपासून ३० टक्के वाढ करा

- मनोज रानडे समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करा

- वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार द्या

- कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘समान काम समान वेतन’ द्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

Vasai Virar drainage cleanup: वसई-विरारमध्ये ५ जूनपर्यंत २०० हून अधिक नाल्यांची सफाई; फ्लड गेट्स, होल्डिंग पाँड्स अद्याप रखडले

SCROLL FOR NEXT