Uddhav Thackeray esakal
मुंबई

Shiv Sena Case: "पक्षादेश माझ्या शिवसेनेचेचा चालणार! आता..."; निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टानं आज महत्वाचा निकाल दिला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे जरी सोपवला असला तरी पक्षादेश हा माझ्या शिवसेनेचाच राहिलं असं म्हटलं आहे. त्यामुळं आता अध्यक्ष महोदयांनी देखील आता यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सत्तेसाठी हापापलेल्यांना चपराक देणारा हा निकाल आहे, असंही यावेळी ठाकरे म्हणाले. (Maharashtra politcal crisis Supreme Court final decision ShivSena case Uddhav Thackeray first comment)

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, हा जो निकालदिला आहे त्यामध्ये एकूणच सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडं-नागडं राजकारण याची कोर्टानं चिरफाड केली आहे. खरं मणजे राज्यपालांची भूमिका अयोग्य होती असं कोर्टानं म्हटलं आहे, त्यामुळं राज्यापाल यंत्रणेचं वस्त्रहरण झालं आहे. हे राज्यात आणि दिल्लीबाबतही घडलं आहे.

अपात्रतेचा निर्णय त्यांनी अध्यक्षांकडे जरी सोपवलेला असला तरी पक्षादेश हा माझ्या शिवसेनेचाच राहिल. आता अध्यक्षांनी देखील यामध्ये वेळ न घालवता यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कायदेशीरदृष्ट्या मी राजीनामा दिला हे चुकीचच असेल पण नैतिकतेच्या दृष्टीनं पाहिलं तर ज्या लोकांना माझ्या पक्षानं विश्वास दाखवला आणि त्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर मी विश्वास का दाखवू?

आज तर राज्यात सरकारच नाही, त्यामुळं जसं मी नैतिकतेचं पालन केलं त्याप्रमाणं सध्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी देखील नैतिकता असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, जसा मी दिला होता, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT