Rahul Narvekar Esakal
मुंबई

Rahul Narvekar: घडामोडींना वेग! आमदार अपात्रतेच्या विषयावर नार्वेकरांना ३१ जुलैपर्यंत SCत द्यावं लागणार उत्तर

सुप्रीम कोर्टानं दिलेला कालावधी संपत आल्यानं नार्वेकरांनी यावर उत्तर दिलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टात ३१ जुलै पर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे, अशी माहिती विधीमंडळ सुत्रांच्या विश्वसनीय सुत्रांकडून मिळते आहे. यावर नार्वेकरांनी प्रतिक्रिया देताना संविधानातील तरतुदींचे पालन करूनच योग्य निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. साम टीव्हीनं याबाबत माहिती दिली आहे. (Maharashtra Political Crisis Rahul Narvekar will have to give their answer to SC by July 31)

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना रिझनेबल पिरियडमध्ये शिवसेनेच्या आमदरांच्या आपात्रतेवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. पण दोन महिन्यानंतरही यावर निर्णय न दिल्यानं उद्धव ठाकरेंच्या गटानं पुन्हा सुप्रीम धाव घेऊन याचिका दाखल केली होती. (Marathi Tajya Batmya)

त्यानंतर कोर्टानं अध्यक्षांना नोटिस पाठवत दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. याचा दोन आठवड्यांचा कालावधी ३१ जुलै रोजी संपत आहे. पण अद्याप कुठलंही उत्तर त्यांनी दिलेलंन नाही. (Latest Marathi News)

सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर देण्यास अध्यक्षांकडं ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर विधीमंडळाकडून कायदेशीर सल्ला घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं अध्यक्षांना दिले होते.

यावर संविधानातील तरतुदींचे पालन करूनच योग्य निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT