मुंबई

"होऊन जाऊ देत दुध का दूध, पानी का पानी"; अतुल भातखळकर जयंत पाटलांवर कडाडलेत

सुमित बागुल

मुंबई : "आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढवल्यास भारतीय जनता पक्षाला पन्नास पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत" असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कळ म्हंटलं होतं. जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून जयंत पाटील यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर निशाणा साधत खरमरीत टीका केली आहे.  अतुल भातखळकर यांनी तसं ट्विट केलं आहे. 

अतुल भातखळकर ट्विट करत म्हटलंय की, "यांनी दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करू नये. जयंतराव भाजपाच्या पराभवाबाबत इतके आश्वस्थ आहात तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या... दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत..."

एकीकडे बिहार निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. बिहारमध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं आहे. त्यानंतर हैद्राबादमध्ये देखील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली आहे. अशात भारतीय जनता पक्षाने वर्षभरावर येऊन ठेपलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी जोरात सुरु केली आहे. मुंबई महानगर पालिकेवर भाजपचाच भगवा फडकवण्याचा निर्धार पक्षाने केलाय. अशात जयंत पाटील यांनी काल केलेल्या वक्तव्यावर मुंबई भाजप प्रभारी अतुल भातखाळकरांनी टीका केलीये. 

maharashtra politics atul bhatkhalkar vs jayant patil over assembly election and strength of mahavikas aaghadi

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खाणीत लिफ्ट पडल्याने 14 लोक अडकले, बचाव कार्य सुरू...7 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

Unseasonal Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा! जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 मे 2024

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

SCROLL FOR NEXT