landslide sakal media
मुंबई

पोलादपूरात भूस्खलन; दरडीखाली 11 जणांचा मृत्यू; 13 जण जखमी

पोलादपूरात भूस्खलन; दरडीखाली 11 जणांचा मृत्यू; 13 जण जखमी Maharashtra Rains: गुरूवारी रात्री घडली दुर्घटना Maharashtra Rains Raigad Poladpur Landslide 11 died 13 severely injured due to heavy rainfall vjb 91

विराज भागवत

Maharashtra Rains: गुरूवारी रात्री घडली दुर्घटना

रायगड: पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे गुरुवारी (22 जुलै) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यावेळी कोसळलेल्या दरडीखाली सुमारे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले असून आणखी काही घरे दरडींसोबत उतारावर वाहून गेली. पोलादपूरात केवनाळे येथे 6 तर गोवेले सुतारवाडी 5 असे एकूण 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पोलादपूर हद्दीतील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी या दोन्ही ठिकाणी बचावकार्य सुरु असून, केवनाळे येथील 6 जणांचा तर गोवेले सुतारवाडी येथे 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रायगड जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री ही घटना कळल्यानंतर प्रशासनाने तसेच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यासाठी आढावा घेतला. कापडे ते कामथे बोरघर रस्त्यावरील कापडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील खांबेश्वरवाडीला जोडणारा पूल अर्धा मधोमध तुटून वाहून गेल्याचे दिसून आले. पोलादपूरातील साखर बोरज येथील पुलदेखील तुटून वाहून गेल्याने गोवेले गावाकडे कोणत्याही प्रकारचे मदतकार्य पोहोचविणे प्रशासनास शक्य झाले नव्हते. मात्र स्थानिकांच्या मदतीने सकाळी बचावकार्याला सुरुवात झाली.

पोलादपूर भूस्खलन- ११ मृत्यू; १३ जखमी

दरडीच्या ढिगाऱ्याखालून केवनाळे येथून 6 जणांचे तर गोवेले सुतारवाडी येथील 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर गोवेले सुतारवाडी येथील 10, केवनाळे येथील 2 आणि कुंभार्डे येथील 1 अशा 13 जखमींना बाहेर काढण्यात आले असून, या सर्वांना प्राथमिक, उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT