Maharashtra Samruddhi Mahamarg Over speeding no parking action traffic police  esakal
मुंबई

Maharashtra Samruddhi Mahamarg : समृध्दी महामार्गावरील वेग पडणार वाहतूकदारांना महागात

ओव्हर स्पिडींग, नो पार्किंगच्या कारवाईला सुरुवात; महामार्ग पोलिसांच्या इंटरसेप्टर वाहनांची करडी नजर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नागपूर - मुंबई समृध्दी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर - शिर्डी ११ डिसेंबर पासून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आला असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माहितीनुसार आतापर्यंत ७० हजार वाहणांपेक्षा जास्त वाहनांनी समृध्दी महामार्गावरून प्रवास केला आहे. ज्यामध्ये ओव्हर स्पीड वाहन चालवनाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पुणे महामार्ग पोलिस विभागांतर्गत येणाऱ्या भागात ११ तारखेपासून आतापर्यंत सुमारे २० पेक्षा अधिक कारवाई करण्यात आल्या असून, सरासरी १३० पेक्षा अधिक किलोमिटर ताशी वेगाने वाहन धावताना आढळून आले आहे.

त्याप्रमाणे औरंगाबाद विभागात अद्याप कारवाईला सुरुवात व्हायची असून, नागपूर विभाग सुद्धा वाहतूकदारांवर कारवाई करण्यात येत आहे. समृध्दी महामार्गावर ठिकठिकाणी इंटरसेप्टर वाहन उभे करण्यात आले असून, १२० किलोमिटर ताशी वेगाने धावणाऱ्या वाहनांवर ऑनलाईन पद्धतीने दंड केल्या जात आहे. यामध्ये नागपूर महामार्ग पोलिसांकडून नो पार्किंग आणि ओव्हरस्पीड धावणाऱ्यावर कारवाई केली जात असून, १३ डिसेंबर पासून आतापर्यंत नो पार्किंगच्या ४ कारवाई करण्यात आल्या आहे. तर ३६ ओव्हर स्पीड वाहनांवर कारवाई केली असून, सीटबेल्ट वापर न करणाऱ्या दोन अशा एकूण ४२ कारवाई करण्यात आल्या आहे.

सध्या स्थानिक नागरिकांकडून दुचाकीने समृध्दी महामार्गावर प्रवास करण्याच्या घटना सुद्धा घडतं असून, स्थानिक नागरिकांचा महामार्गावर वावर असल्याने महामार्ग पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. शिवाय बऱ्याच ठिकाणी गावठी जनावरांचा म्हणजे कुत्र्यांचा सुद्धा महामार्गावर वावर असल्याने अपघातांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान समृध्दी महामार्गावर प्रवास करतांना वाहनांचा वेग १२० किलोमिटर ताशी वेगापेक्षा अधिक असल्यास जीवघेण्या अपघात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगावर नियंत्रण पाळा अपघात आणि कारवाई सुद्धा टाळा असे आवाहन महामार्ग पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT