मुंबई

दहावी निकालाची तयारी अंतिम टप्प्यात; निकालाची तारीख दोन दिवसात जाहीर होणार?

तेजस वाघमारे

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेच्या निकालाची तारीख येत्या दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून निकालाची तयारी अंतिम टप्प्यात अली असून, यासंदर्भात सोमवारी (ता.27) आढावा बैठक झाली. आज किंवा उद्या मंडळाकडून निकालाच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे यंदा दहावी परीक्षेचा निकाल लांबणीवर गेला आहे. लॉकडाऊनमुळे मुंबई आणि परिसरात पोस्ट कार्यालय आणि शाळांमध्ये दहावीच्या उत्तरपत्रिका मोठ्या प्रमाणात तपासाविना पडून होत्या. त्या तपासण्याचे काम पूर्ण झाले असून त्यासंर्दभातील संपूर्ण डेटा राज्य शिक्षण मंडळाकडे सोपविण्यात आला आहे. तर पुणे विभागातही अशाच प्रकारे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम रखडले होते, त्याचेही काम पूर्ण झाले आहे. त्याचाही डेटा मंडळाकडे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता मंडळातील वरिष्ठ सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. 

राज्य शिक्षण मंडळाचे मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, लातूर, औरंगाबाद आणि कोकण असे नऊ विभागीय शिक्षण मंडळ आहेत. यापैकी पुणे आणि मुंबई विभागीय मंडळातील उत्तरपत्रिका तपासण्यात विलंब झाला होता. त्यातील सर्वाधिक उत्तरपत्रिका मुंबई विभागात रखडल्या होत्या. दहावी परीक्षा सुमारे 17 लाख विद्यार्थानी दिली आहे. दहावीचा निकाल जाहीर न झाल्यामुळे अकरावी आणि इतर अभ्यासक्रमाचे प्रवेश रखडले आहेत. निकाल जाहीर होताच विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT