मुंबई

मोठी बातमी - ग्रीन झोन भागातील उद्योग सोमवार नंतर सुरू करण्यावर चाचपणी सुरु  

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  मुंबई  व परिसरातील महानगरपालिकांचे क्षेत्र वगळून कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागातील उद्योग येत्या सोमवार नंतर  सुरू करता येतील का, याबाबतची चाचपणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.

कोरोनामुळे ठप्प झालेले उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने स्थापन केलेल्या कृती गटातील अधिकाऱ्यांची आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी,उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, संचालक वैद्यकीय शिक्षण, तात्याराव लहाने,  संचालक एनआरएच एम अनुपकुमार यादव, आदी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुळे बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत आढावा घेण्यात आला.

यावेळ देसाई म्हणाले की, उद्योगांना आर्थिकदृष्ट्या चालना मिळावी,यासाठी केंद्र सरकारने पाठविलेल्या मार्गदर्शक सूचना महत्वाच्या आहेत.या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन येत्या 20 तारखेनंतर राज्यातील कोणत्या भागांतील उद्योग सुरू करता येतील,याचा आज आढावा घेऊन एक सूत्र तयार केले आहे.ज्या भागात कोरोनामुळे प्रतिबंध लागु आहेत, अशा ठिकाणी उद्योग सुरू करता येणार नाहीत. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, पनवेल, वसई-विरार, भिवंडी, पुणे- चिंचव़ड तसेच नागपूर या भागांचा समावेश असेल.इतर ठिकाणी आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाशी सल्लासलत करून परिस्थितीनुसार 21 तारखेच्या आसपास उद्योग सुरू करता यदतील का, याबाबत विचार केला जाईल. उद्योग विभागाच्या कृतीदलाने याबाबत तयार केलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी उद्योगांना कशी चालना देता येईल, यासाठी उद्योग विभागाने नियम केले आहेत. यात जे उद्योग आपल्या कामागारांना कारखान्याच्या किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करतील, त्यांना परवानागी दिली जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे उद्योग नियम पाळतील, वाहतुकीची व्यवस्था करणाऱ्यांना देखील सूट दिली जाईल. एमआयडीसी मध्ये लघु उद्योगांनी एकत्र येऊन कामगारांची राहण्याची सोय केल्यास त्यांना मदत केली जाईल.

साधारणपणे रोजगार गमावलेल्या लोकांना उत्पादनाचे साधन मिळावे, हाताला रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्योग सूरू करण्यामागचा हेतू आहे. हे करताना शेती आधारित उद्योगांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामांसाठी मदत होणार असल्याचा मानस देसाई यांनी व्यक्त केला.

maharashtra state government is checking feasibility of starting business in covid green zones 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT