मुंबई

नवी मुंबई, पनवेलमध्ये कोरोनाचा फटका; रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

सकाळवृत्तसेवा

सध्या महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. म्हणूनच सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे. अनेकांना कोरोनाची लस घेतल्यानंतरही या विषाणूची लागण झाल्याचं समोर येत आहेत. त्यातच नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे.

मार्च महिन्यात दोन्ही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना रुग्णांच्या सर्वाधिक नोंदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या ४ महिन्यांमध्ये ही आकडेवारी वाढल्याचं सांगण्यात येत आहे. यात मृत्यूदराचं प्रमाण मात्र कमी आहे. सध्या महाराष्ट्रात रात्री ८ ते सकाळी ७ यावेळात नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना पाहायला मिळत आहे.

मार्च महिन्यात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० हजार ११० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मार्च महिन्यात ५ हजार ७३५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

"यापुढेदेखील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत याच पद्धतीने वाढ होत राहिली तर हा गंभीर चिंतेचा विषय ठरले. ३१  मार्चपर्यंत आमच्याकडे एकूण ६ हजार १३६ सक्रीय कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जर आणखी एका आठवड्यात रुग्ण संख्या वाढली तर ही नक्कीच चिंतेची बाब असेल", असं नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सध्या १४४ आईसीयू बेड, ८२ व्हेंटिलेटर बेड यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन बेडचीदेखील सोय आहे. 

दरम्यान, आतापर्यंत नवी मुंबई महानगरपालिका या क्षेत्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. आतापर्यंत ५५ जणांचा मृत्यू झाला. 

कोरोनाग्रस्तांची संख्या

नवी मुंबई महानगरपालिका 

६ हजार १३६- सक्रीय (३१ मार्चपर्यंत)
५५ -मृत्यू (३१ मार्चपर्यंत)
१० हजार,११० - मार्च २०२१ 
१० हजार, ८७८ - नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत पॉझिटिव्ह असल्याच्या नोंद
 पनवेल महानगरपालिका
२ हजार ४६५ - सक्रीय  (३१ मार्चपर्यंत)
२८- मृत्यू (३१ मार्चपर्यंत)
५ हजार, ७३५ - मार्च २०२१ 
५ हजार, ७४९ - नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत पॉझिटिव्ह असल्याच्या नोंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Latest Maharashtra News Updates : धुळे बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

SCROLL FOR NEXT