मुंबई

कॉग्रेसच्या नाराजीवर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण, मंत्री राजेश टोपे म्हणतात...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला विश्वासात घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार काम करत असल्याचा निर्वाळा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षाच्या आघाडी सरकारमधे काँग्रेस पक्षाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही. अशा आशयाचे  वृत्त आल्याने त्याबाबत टोपे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना  विश्वासात घेऊनच महाविकास आघाडी सरकारचे कामकाज सुरु आहे.त्यामुळे नाराजीचा प्रश्न येत नाही.राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नसल्याने काँग्रेसपक्ष  नाराज आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य केले होते. याबाबत विचारले आसताना टोपे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत,असा खुलासा केला.

ते म्हणाले की काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विश्वासात घेऊनच काम होत आहे. काँग्रेसकडे दुर्लक्ष नाही. आघाडी सरकारची एक  कोअर कमिटी आहे. या कमिटीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी दोन ज्येष्ठ नेते आहेत. या सर्व नेत्यांच्या कोअर कमिटीची बैठक होते. ही कोअर कमिटी एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेते.

maharashtras health minister rajesh tope made comment on congress

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT